ठाणे- शहरातील कापूरबावडी परिसरात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी १२ हून अधिक हुक्का बहाद्दरांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री उशिरा ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
ठाण्यातील कापूरबावडीतील हुक्का पार्लरवर छापा, अनेक हुक्का बहाद्दर पोलिसांच्या ताब्यात - Hookah Parlours In thane
ठाण्यातील कापूरबावडी परिसरातल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यामध्ये १२ हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले.
नाईट कर्फ्यू लागू असतानाही सुरू होता हुक्का -
विदेशात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर राज्यातील महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात कोणतेही हॉटेल, बार, हुक्का पार्लर, ढाबा सुरू ठेवण्यास परवानगी नाही. पोलिसांनाकडून नाईट कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कापूरबावडी परिसरात लोढा के ३६० हा हुक्का पार्लर सुरू होता. त्यावर छापेमारी करत पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी जवळपास १२ पेक्षा जास्त हुुक्का बहाद्दरांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.