महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / jagte-raho

कोल्हापूरमध्ये बिष्णोई गँगच्या नावाने खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक - Extortion demand to merchants in Kolhapur

कोल्हापुरातील कापड व्यापाऱ्यांकडे आरोपींनी खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही तर, नातेवाईकांना संपण्याचीसुद्धा धमकी दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेने दोघांनही खंडणीबहाद्दरांना अटक केली आहे.

अटकेतील आरोपी
अटकेतील आरोपी

By

Published : Jan 8, 2021, 10:15 PM IST

कोल्हापूर - गँगस्टर रवी पुजारी आणि बिष्णोई गॅंगच्या नावाने खंडणी मागणाऱ्या दोघांच्या कोल्हापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अजय वालेचा आणि सुमित अडवाणी असे या दोन खंडणीबहाद्दरांचे नाव आहे. गांधीनगर येथील व्यापाऱ्यांकडे या दोघांनी तब्बल 20 लाखांची खंडणी मागीतली होती.

कोल्हापुरातील कापड व्यापाऱ्यांकडे आरोपींनी खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही तर, नातेवाईकांना संपण्याचीसुद्धा धमकी दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेने दोघांनही खंडणीबहाद्दरांना अटक केली आहे.

हेही वाचा-सोसायटीचा सुरक्षारक्षकच झाला भक्षक, अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे

न्यायालयाने आरोपींना दिली पोलीस कोठडी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी गांधीनगर येथील कापड व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे खंडणी मागितली होती. त्यांचा स्वाभाग अतिशय शांत असल्याने त्यांची माहिती काढूनच खंडणीबहाद्दरांनी त्यांच्याकडे 20 लाख रुपयां खंडणी मागितली. वारंवार खंडणीसाठी फोन येऊ लागल्याने संबंधित व्यापाऱ्याने खंडणीबहाद्दरांचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर त्या दोघांनी व्यापाऱ्यांच्या कुटुंबियांना मेसेज करून खंडणीची मागणी केली. खंडणी दिली नाही तर, पळवून नेईल अशी धमक सुद्धा दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार संबंधित व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितला. दिलेल्या तक्रारीनुसार 6 जानेवारीला गांधीनगर पोलीस ठाण्यात या खंडणीबहद्दरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा-नंदुरबारमध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई


गांधीनगरमधील कापड व्यापाऱ्यांना वारंवार खंडणीखोरांचा त्रास

गांधीनगर येथे मोठ्या प्रमाणात कापड व्यवसाय करणारे व्यापारी आहेत. यापूर्वीसुद्धा या व्यापाऱ्यांनी खंडणी बहाद्दरांना वारंवार त्रास होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक व्यापारी अशा खंडणी बहाद्दरांना भीतीपोटी पैसेदेखील देतात. यापुढे कोणाला अशा पद्धतीने त्रास होत असेल तर माझ्याकडे तक्रार द्या, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. व्यापाऱ्यांच्या सुरक्षेची हमी आम्ही देतो, असा विश्वाससुद्धा त्यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details