महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / jagte-raho

औरंगाबादेत दुकान फोडणारी टोळी गजाआड; चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त - औरंगाबाद चोरी

३ नोव्हेंबरला गणपत आसाराम म्हस्के यांच्या दुकानातील ९५०० रूपये चोरीला गेले होते. आरोपींना जवाहर नगर पोलिसांनी अटक केली आहे. शेख अफरोज शेख गुलाब आणि शेख अली शेख सत्तार पठाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  या प्रकरणात एक अल्पवयीन मुलाचादेखील समावेश आहे. शेख गुलाब याने अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

औरंगाबादेत दुकाने फोडणारी टोळी गजाआड

By

Published : Nov 10, 2019, 11:29 AM IST

औरंगाबाद - दुकान फोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपींना जवाहर नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून चोरीला गेलेला मुद्देमालदेखील जप्त करण्यात आला आहे. शेख अफरोज शेख गुलाब आणि शेख अली शेख सत्तार पठाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

औरंगाबादेत दुकान फोडणारी टोळी गजाआड

३ नोव्हेंबरला गणपत आसाराम म्हस्के यांच्या दुकानातील ९५०० रूपये चोरीला गेले होते. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात एक अल्पवयीन मुलाचादेखील समावेश आहे. शेख गुलाब याने अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये बनावट कागदपत्राद्वारे जामीन मंजूर करुन घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल खाडे, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे, निरीक्षक नरेंद्र जाधव, सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे, डी. बी.पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भारत पाचोळे यांच्या पथकाने केली.

ABOUT THE AUTHOR

...view details