महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / jagte-raho

सुशिक्षित गुन्हेगारांची वाढती संख्या, चिंतेचा विषय

भारताची लोकसंख्या १३५ कोटींच्या घरात असून वाढत्या लोकसंख्येसोबत वाढणारे गुन्हे, त्याचे वेगवेगळे प्रकारही वाढत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापरासोबत डिजिटल गुहेगारी वाढली आहे. यात अशिक्षित किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींपेक्षा व्हाइट कॉलर गुन्हेगार अधिक असल्याचे समोर येत आहे. डिग्री आहे, ज्ञान आहे. मात्र, या दोन्हींचा वापर योग्य ठिकाणी करण्याची नीतीमूल्ये या तरुणांमध्ये रुजवणे गरजेचे असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई सायबर गुन्हेगार लेटेस्ट न्यूज
मुंबई सायबर गुन्हेगार लेटेस्ट न्यूज

By

Published : Dec 6, 2020, 2:09 PM IST

Updated : Dec 8, 2020, 12:56 PM IST

मुंबई - भारताची लोकसंख्या १३५ कोटींच्या घरात असून वाढत्या लोकसंख्येसोबत वाढणारे गुन्हे व त्याचे वेगवेगळे प्रकार सुद्धा वाढत असल्याचे समोर यायला लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात खास करून शहरी भागात डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे. यातच डिजिटल गुहेगारी वाढली असून यात अशिक्षित किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींपेक्षा व्हाइट कॉलर गुन्हेगार हे अधिक असल्याचे समोर येत आहे. सध्या डिजिटल सायबर गुन्हेगारी विश्वात सुशिक्षित गुन्हेगार हे मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. यावरचा ईटीवी भारतचा हा विशेष रिपोर्ट..

सुशिक्षित गुन्हेगारांची वाढती संख्या, चिंतेचा विषय
शहरात वाढले व्हाइट कॉलर गुन्हे

बदलत्या काळानुसार डिजिटल माध्यमात सुद्धा दिवसेंदिवस वेगळ्या रूपात समोर यायला लागलेली आहे आणि याचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची लोकसंख्या 1 कोटी 85 लाखांच्या घरात आहे आणि या देशाच्या आर्थिक राजधानीत मोठ्या प्रमाणात डिजिटल गुन्हेगारी ही वाढलेली पाहायला मिळत आहे . जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2020 या पर्यंतचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर मुंबई शहरात तब्बल 1986 सायबर गुन्हे घडले आहेत यामध्ये आतापर्यंत केवळ 139 गुन्ह्यांचा तपास लागलेला आहे. त्या गोष्टीचा आढावा घ्यायचा झाला तर संगणकाच्या सोर्स कोड सोबत छेडछाड करण्याचा एक गुन्हा गेल्या वर्षभरात आहे मुंबईत रजिस्टर करण्यात आलेला आहे तर सायबर हल्ला करण्याचे 13 गुन्हे , इंटरनेटवर सतत असलेल्या व्यक्तींसोबत संपर्कात राहून नायजेरियन फ्रॉड , हॅकिंग सारखे प्रकार 27 वेळा घडलेले असून , ई-मेल , एसएमएसच्या माध्यमातून अश्लील संवाद साधने , अश्लील ध्वनीफिती व चित्रफिती पाठवून अल्पवयीन मुली व महिलांच्या विनयभंगाचे 198 प्रकार घडलेले आहेत . सोशल माध्यमांवर बनावट प्रोफाइल बनवून त्याद्वारे आर्थिक फसवणूक किंवा खंडणी मागण्याचे 25 गुन्हे मुंबई शहरात घडलेले आहेत. तर क्रेडीट कार्ड च्या संदर्भात आर्थिक लूट केल्याचे 455 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत . इंटरनेटच्या गुन्हेगारीच्या इतर प्रकरणात 1267 गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.

हेही वाचा -धक्कादायक! दिवाळीत आणललेल्या कार्बाईड गनमुळे शेकडो लोकांच्या डोळ्यांना इजा; काहीजणांना अंधत्व


भारतात 36 टक्के स्मार्ट फोन युजर

एका अहवालानुसार 135 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये स्मार्टफोन वापरणाऱ्या नागरिकांची संख्याही 36 टक्के एवढी असल्याचे समोर आलेल आहे. इंटरनेटच्या जगामध्ये भारतातील जवळपास 36 टक्क्याहून अधिक व्यक्ती या सतत सायबर विश्वात वावरत असतात. कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये लॉकडाउन दरम्यान या स्मार्टफोन युजरच्या संख्येत आणखीन भर पडलेली आहे. इंटरनेट डेटा सर्वाधिक वापरला जात असून याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार सुद्धा सध्या केले जात आहेत. यामुळे झटपट पैसा कमवण्याची इच्छा असलेल्या सुशिक्षित गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी वाढल्याचे समोर आले आहे.

मुंबई पोलीस खात्यातील माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांच्या अनुभवानुसार देशात शैक्षणिक क्षेत्रात जरी प्रगती होत असली तरी सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्याही तेवढीच वाढत चाललेली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून झटपट पैसा कमवण्यासाठी अशा सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून झटपट पैसा कमवण्यासाठी सायबर विश्वातील गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल पडत चालले आहे. डिग्री आहे, ज्ञान आहे. मात्र, या दोन्हींचा वापर योग्य ठिकाणी करण्याची नीतीमूल्ये या तरुणांमध्ये रुजवण्यासाठी योग्य पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सुशिक्षित गुन्हेगारांच्या संख्येत लॉकडाऊन काळात वाढ - सायबर सायकॉलॉजिस्ट

सायबर सायकॉलॉजिस्ट निराली भाटिया यांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊनदरम्यान अनेक सुशिक्षित तरुणांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकटे उभी राहिली होती. गेल्या सहा महिन्यांपासून बरेच नागरिक हे घरामध्ये अडकून पडल्यामुळे मानसिक दबावाखाली असलेल्या या व्यक्तींचा अधिकाधिक संपर्क इंटरनेटवर सायबर विश्वाशी आला होता. यादरम्यान, स्वतःच्या मनात असलेली चीड व्यक्त करण्यासाठीही काही वेळा सायबर गुन्हेगारीसारख्या कृती अशा व्यक्तीकडून घडत असल्याचे भाटिया यांचे म्हणणे आहे.


हेही वाचा -EXCLUSIVE : राज्यात रक्ताचा तुटवडा, शक्य त्यांनी रक्तदान करावे - दिलीप वळसे-पाटील

Last Updated : Dec 8, 2020, 12:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details