लातूर - जिल्ह्यात गेल्या 12 दिवसांपासून टाळेबंदी लागू आहे. शिवाय 14 दिवसांपासूनच जिल्ह्यातील दारूची दुकाने बंद आहेत. त्यामुळे आता अवैध दारुविक्रीची प्रकार समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी लातूर शहरात तर सोमवारी (दि. 27 जुलै) निलंगा तालुक्यात आणि चाकूर तालुक्यातील सुगावमध्ये अवैध दारू विक्रीवर छापा टाकण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 2 लाख 60 हजार रुपये किंमतीची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमध्ये अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले; सलग तिसऱ्या दिवशी कारवाई - राज्य उत्पादन शुल्क लातूर बातमी
जिल्ह्यात टाळेबंदी सुरू असल्याने दारुची दुकानेही बंदी आहेत. यामुळे अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी राज्य उत्पादन शुक्ल विभागाने अवैध दारू विक्रीवर छापा टाकण्याचे काम सुरू आहे. सोमवारी (दि. 27 जुलै) निलंगा व चाकूर चालुक्यातील सुगावमध्ये छापा टाकण्यात आला.
जिल्ह्यात लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच दारूची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले होते. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला होता. सलग 14 दिवस दारुची दुकाने बंद असल्याने आता तळीरामांचा घालमेल होऊ लागला आहे. त्यामुळेच अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी लातूर शहरातील एका घरामध्ये दारुसाठा पकडण्यात आला होता. निलंगा आणि चाकूर तालुक्यात पोलिसांनी कारवाई केली आहे. चाकूर तालुक्यातील सुगाव येथील गायकवाड यांच्या शेतामध्ये 2 लाख 60 हजारांचा मद्यसाठा आढळून आला आहे. कारवाई दरम्यान आरोपी पळून गेले आहेत. मात्र, पोलीस त्यांच्या मागावर असून तब्बल 2 लाख 60 हजाराची दारु पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.