महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / jagte-raho

वैद्यनाथ कारखान्यातील चोरी प्रकरणात चार जणांना अटक, काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा सामावेश - Four arrested in Vaidyanath factory theft case

मंगलदादा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती आहे. आतापर्यंत त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत. वैद्यनाथ कारखान्यातील चोरीमागे त्याचा हात असल्याने पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

वैद्यनाथ कारखान्यातील चोरी प्रकरणात चार जणांना अटक
वैद्यनाथ कारखान्यातील चोरी प्रकरणात चार जणांना अटक

By

Published : Dec 26, 2020, 9:18 AM IST

बीड-वैद्यनाथ साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या चोरी प्रकरणामागे राष्ट्रवादीच्या एका नगरसेविका पतीचा हात असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या नगरसेवकाचा कसून शोध घेत असून काल तो पोलिसाच्या तावडीतून निसटला, मात्र त्याच्या इतर चार सहका-यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेले चारपैकी तिघे परळीतील व एक लातूरचा असल्याचे समोर आले आहे.

चार दिवसात प्रकरणाचा छडा-

बीड जिल्हयातील वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशॉप गोदामातून नुकतेच संगणक संच, मॉनिटर, कॉपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड असे विविध साहित्य चोरटयांनी लंपास केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. ज्याची किंमत सुमारे ३७ लाख ९४ हजार ९१४ इतकी होती. कारखान्याचे लिपीक खदीर शेख यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी भा.द.वि ४६१,३८० कलमान्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय होता, त्यावरून पोलिसांनी रमेश उर्फ पिंटू माणिक काळे, सलाऊद्दीन गफार सय्यद, मोशीन गौस काकर (सर्व रा. परळी) व मुतजीन मुनीर शेख रा. लातूर यांना अटक केली. या चोरी प्रकरणी पोलिसांनी अजीज इस्माईल उर्फ मंगलदादा शेख रा. परळी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

काँग्रेस नरगसेविकेचा पती निघाला चोर-

मंगलदादा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती आहे. आतापर्यंत त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत. वैद्यनाथ कारखान्यातील चोरीमागे त्याचा हात असल्याने पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. काल शोध घेताना पोलिसाच्या तावडीतून तो निसटला पण त्याच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात यश आले आहे. पोलीस मंगलदादाच्या मागावर असून त्याला लवकरच अटक करू असे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details