महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / jagte-raho

निलंगा पोलीस ठाण्यात आग ; गुन्ह्यात जप्त केलेल्या गाड्यांची राख - Fire

निलंगा पोलीस ठाण्यास अचानक लागलेल्या आगीत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या 2 मोठ्या आणि 2 मोटारसायकली जळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

निलंगा पोलीस ठाण्यात आग

By

Published : Jun 19, 2019, 11:57 PM IST


लातुर : निलंगा पोलीस ठाण्यास बुधवारी पहाटे 2 च्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या 2 मोठ्या आणि 2 मोटारसायकली जळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी ठाण्याच्या मागच्या बाजूस लावण्यात आलेल्या दुचाकींना ही आग लागली होती.

निलंगा पोलीस ठाण्यात आग

निलंगा पोलीस ठाण्याच्या समोरच्या बाजूस पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस निरीक्षक अनिल चोरमोले हे कर्तव्य बजावत होते. पहाटे 2 च्या सुमारास ठाण्याच्या मागच्या बाजूस आग लागल्याचे काही नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळतास सर्व कर्मचारी हे ठाण्याच्या मागच्या बाजूस धावत आले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. पालिकेच्या अग्निशमन दलाला फोन करून पाचारण करण्यात आले. तोपर्यंत दोन जीप व 2 मोटारसायकल जळून खाक झाल्या होत्या. तर रेकॉर्डरूमचेही नुकसान झाले होते. दरम्यान, नागरिकांनी घरातील पाणी आणून आग विझवण्याचाही प्रयत्न केला होता. गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले 25 बॅरेल या ठाण्याच्या आवारातच होते. या बॅरलने पेट घेतला असता तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र, अग्निशमन दलाचे बंब आणि नागरिकांनी दाखवलेली समयसूचकता यामुळे मोठी दुर्घटना टळली.

ABOUT THE AUTHOR

...view details