मुंबई - राज्यात लॉकडाउनच्या काळात सायबर गुन्हेगार हे नागरिकांना फसविण्यासाठी विविध क्लुप्त्यांचा वापर करत आहेत. तुमचा मोबाईल फोन हरवला गेला असेल आणि तुम्हाला तुमच्या हरवलेल्या मोबाईल संदर्भात एखादा ईमेल आला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. याचे करण म्हणजे आता चक्क पोलिसांच्या नावाने ईमेल पाठवून हरवलेल्या मोबाईलसाठी काही पैसे भरून परत देण्यात येईल, अशा प्रकारचा मेल नागरिकांना पाठवून त्यांची लूट केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
कशा प्रकारे होतेय फसवणूक -
मोबाईल फोनचा वापर करणारी व्यक्ती ही स्वतःचा मोबाईल फोन हरवल्यानंतर त्याची तक्रार नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करते. मात्र, पोलिसांकडून त्याचा तपास न लागल्यास, पुन्हा नवीन मोबाईल विकत घेऊन, त्याचा वापर करण्यास सुरुवात करतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार हे चक्क पोलीसांच्या नावाने पीडित व्यक्तीला ईमेल पाठवत आहेत. या ईमेलमध्ये 'तुमचा हरविलेला मोबाईल सापडला आहे. तो परत मिळण्याकरता ठराविक खर्च आहे. तो तुम्ही केलात कि तुम्हाला तुमचा मोबाईल परत मिळेल. लॉकडाऊनच्या काळात आम्ही प्रत्यक्ष येऊ शकत नाही, त्यामुळे ई-मेलमध्ये नमूद केलेल्या बँक खात्यात पे टिएम, गुगल पे किंवा अन्य माध्यमांद्वारे आपण ठराविक रक्कम जमा करावी' असे काहिसे लिहिलेले असते. मात्र, कुठल्याही व्यक्तीला पोलीस विभागाकडून अशा प्रकारचे मेल केले जात नसल्याचे सायबर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काय करायला हवे -