हिंगोली - आई आजारी असल्याचा बहाणा करून एका 17 वर्षीय युवतीला सेनगाव येथून दुचाकीवरून हिंगोली येथे आणले. येथील गायत्री नगरमध्ये असलेल्या भाड्याच्या खोलीत दोन दिवस, नंतर इटोली शिवारात असलेल्या झोपडीत नेऊन चार दिवस तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही बाब कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात 376 सह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पंढरी पंडित थिटे (28) रा. लिंबाळा हुडी अस आरोपीचे नाव आहे. त्याने पीडितेला आई हिंगोली येथे आजारी आल्याची खोटी माहिती दिली. आरोपीवर विश्वास ठेवून पीडिता आरोपीच्या दुचाकीवर बसून हिंगोलीत आली असता आरोपीने गायत्री नगर भागात असलेल्या खोलीत नेऊन तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला. नंतर तिला गावाकडे सोडण्याचा परत बहाणा करून लिंबाळा हुडी भागात असलेल्या इटोली येथील शेत-शिवारात एका झोडीतही तो तिच्यावर चार दिवस बलात्कार करत राहिला. ही घटना 14 ते 21 जुलै दरम्यान घडली. ही बाब कुणाला सांगितल्यास जिवे मारून टाकण्याची धमकी आरोपीने या पीडितेला दिली. तेव्हापासून पीडिता मानसिक तणावाखाली होती. तिने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. तेव्हा नातेवाइकांनी पीडितेसह पोलीस ठाणे गाठून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आई आजारी असल्याच्या बहाण्याने खोलीवर नेऊन लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल - Hingoli Sengaon Rape News
आई आजारी असल्याचा बहाणा करून सेनगाव येथील 17 वर्षीय युवतीला हिंगोली येथे आणून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याविषयी कोठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी तिला देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
हिंगोली क्राईम न्यूज
आरोपी अजून फरार असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने, सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षण सरदातसिंह ठाकूर यांनी भेट दिली. तर फरार आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना झाले आहेत.