दौंड (पुणे) -तालुक्यातील पारगाव येथील ओम श्री गणेशा या कॉम्प्लेक्समधील एटीएम मशीन आणि त्यात असणारी रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत मिळालेली माहिती अशी, दौंड तालुक्यातील पारगाव येथील ओम श्री गणेशा या कॉम्प्लेक्समधील राजेंद्र दत्तात्रय ताकवणे यांच्या नावावर असणाऱ्या गाळ्यातील इंडिकॅश कंपनीचे दोन एटीएम मशीन होते. यातील एक एटीएम मशीन याची अंदाजे किंमत ६० हजार रुपये आणि त्यातील रोख रक्कम रुपये ६ हजार ८०० रुपये, असा एकूण ६६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास चोरून नेला आहे .
दौंड तालुक्यातील पारगाव येथून एटीएम मशीनची चोरी
दौंड तालुक्यातील पारगाव येथील एका कॉम्प्लेक्समधील एटीएम मशीन रोख रक्कमेसह अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ठिकाणाहून एटीएम चोरण्यात आले
या चोरीबाबत एटीएम ऑफिसर महेश आदिनाथ भारती यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात यवत पोलीस ठाण्यांतर्गत असणाऱ्या केडगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे . या प्रकरणाचा अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.