महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / jagte-raho

जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याचे सांगून नोकरीच्या बहाण्याने फसवणारा जेरबंद - सातारा गुन्हे बातमी

मी जिल्हाधिकारी कार्यालयात कामाला असून तुम्हाला टेंडर देतो व तुमच्या पत्नीस नोकरी लावतो, अशी थाप मारून पैसे लुबाडणाऱ्या एकास शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर जवळच्या पोलीलस ठाण्यास संपर्क साधण्याचे साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आरोपीसह पोलीस पथक
आरोपीसह पोलीस पथक

By

Published : Nov 22, 2020, 5:20 PM IST

सातारा - जिल्हाधिकारी कार्यालयात कामास आहे, असे सांगून ब्लिचींग पावडरचे टेंडर मिळवून देतो तसेच पत्नीस नोकरीस लावतो म्हणून साताऱ्यातील एकाची 44 हजारांची फसवणूक करणाऱ्यास शाहूपुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

तौसिफ दस्तगीर शेख (रा. सरताळे, ता. जावळी), असे त्याचे नाव आहे. सातारा शहरातील बुधवार पेठेत राहणारे अमीन शेख यांना जावळी तालुक्यातील एकाने जिल्हाधिकारी कार्यालयात कामास आहे, असे सांगत अमीनच्या पत्नीस नोकरीस लावतो. तसेच ब्लिचींग पावडरचे टेंडर मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्याबदल्यात रोख 44 हजार 200 रुपये उकळे होते. मात्र, शब्द न पाळता त्याने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.

गुन्ह्याची कबुली

अमीन शेख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयीताचा शोध घेतला. तो मुळ गावी सरताळे येथे राहत नसल्याचे आढळले. अधिक तपास करुन पोलिसांनी संशयितास कुडाळ (ता.जावळी) येथे ताब्यात घेतले. गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

आणखी लोकांना फसवल्याची शक्यता

या संशयिताने अशाच प्रकारे इतर लोकांची फसवणूक केली असल्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारे ज्या नागरीकांची फसवणूक झाली आहे. त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे किंवा नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details