वर्धा- शहरातील तारफैल परिसरात सात ते आठ वर्षीय बालकाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर सायंकाळी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने तणाव निर्माण झाला. या प्रकरणात आरोपी विरुद्ध अनैसर्गिक कृत्य करून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहराच्या तारफैल परिसरात पाण्याच्या टाकीत अर्धनग्न अवस्थेत या बालकाचा मृतदेह आढळून आल्याने संतापलेल्या नागरिकांनी 26 वर्षीय तरुणास बेदम मारहाण केली. यावर संतप्त नागरिकांचा 400 लोकांचा जमाव शहर पोलीस ठाण्यावर चालून गेला. यावेळी आरोपीला आमच्याकडे द्या, त्याला कठोर शिक्षा द्या अशी मागणी जमावाने केली. यावेळी वातावरण तापल्याने अधिकची कुमक तैनात करण्यात आली. प्रकरणाची गंभीरता पाहता पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.
आरोपी हा त्याच परिसरातील...