महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / jagte-raho

तपोवनात आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलले; गर्भपातासाठी त्रास दिल्याने तरुणाने केली तिची हत्या - गर्भपातासाठी त्रास दिल्याने हत्या

नाशिकच्या तपोवन परिसरात आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. गर्भपाताच्या कारणावरून तरुणीची हत्या झाल्याचे समोर आले आहे.

तपोवनात आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलले;
तपोवनात आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलले;

By

Published : Dec 16, 2020, 7:37 AM IST

Updated : Dec 16, 2020, 8:32 AM IST

नाशिक - शहराच्या तपोवन परिसरातील रामटेकडी भागांमध्ये रविवारी (दि.13) काही नागरिक फिरत असताना त्यांना कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह एका सतरा ते वीस वर्षातील अल्पवयीन मुलीचा असल्याचा अंदाज त्यावेळी पोलिसांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अज्ञात अरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात या गुंतागुंतीच्या खुनाचा छडा लावला आहे.

गर्भपातासाठी त्रास दिल्याने तरुणाने केली तिची हत्या
घटनास्थळावर मिळालेल्या मेडिकल फाईल आणि मोबाईल रेकॉर्डवरून पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. मृत युवती ही तीन महिन्यांची गरोदर असल्याचे धक्कादायक वास्तव तपासात समोर आले आहे. या युवतीने आपल्या नातलग असलेल्या 20 वर्षीय दानिश जावेद कुरेशी या युवकाकडे तू माझा पती म्हणून गर्भपातासाठी माझ्यासोबत चल, अन्यथा मी हे बाळ तुझे असल्याच सर्वांना सांगेल, असा तगादा लावला होता. याच जाचाला कंटाळून संशयित आरोपी दानिश कुरेशी याने या युवतीची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या-

तपोवन परिसरामध्ये एक वैद्य असून तो जडीबुटीच्या सहाय्याने गर्भपात करून देत असल्याची खोटी माहिती दानिशने त्या तरुणीला दिली. त्यानंतर तिला 5 डिसेंबरला रात्री दोन वाजेच्या सुमारास तपोवन भागातील रामटेकडी परिसरात नेले आणि याठिकाणी तिचा गळा आवळून आणि तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. ही सर्व माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये उपलब्ध माहितीच्या आधारे गुन्हे शाखा आणि भद्रकाली पोलिसांनी या कुजलेल्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा लावला. त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

Last Updated : Dec 16, 2020, 8:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details