उस्मानाबाद- कोरोनाग्रस्तांचा आकडा जिल्ह्यात सहाशेच्या पार गेला आहे. यात कारागृहांमध्ये सापडलेल्या कैदी रुग्णांचा देखील समावेश होता. मात्र, आता जिल्हा कारागृहातील 12 कैद्यांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हा
उस्मानाबाद : कारागृहातील १२ कैद्यांची कोरोनावर मात; 23 कैदी आढळले होते पॉझिटिव्ह - उस्मानाबाद कोरोना बातमी
उस्मानाबाद जिल्हा कारागृहातील 23 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 12 कैद्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
कारागृहात सुरुवातीच्या टप्प्यात 6 कैदी कोरोना पॉझिटिव आढळले होते. त्यानंतर रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्स माध्यमातून कारागृहातील 58 कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे कारागृहातील 23 कैदी कोरोना पॉझिटिव्ह सापडले या एका महिलेसह तिचा एक वर्षाच्या मुलाचा देखील समावेश होता. आता या 23 कैद्यांपैकी बारा कैद्यांनी कोरोनावर मात केली असून उर्वरित कैद्यांची तब्येत व्यवस्थित असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राज गलांडे यांनी सांगितले.
जिल्हा कारागृहात कोरोनाने प्रवेश केल्याने जिल्ह्याची धडधड वाढली होती. या सर्व कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांना जिल्हा रुग्णालयात तात्पुरते कारागृह उभा करून याच ठिकाणी या पॉझिटिव्ह कैदी रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. त्यापैकी बारा रुग्णांनी या कोरोनावर मात केली असून इतर कैदी लवकर कोरोना मुक्त होतील, असा विश्वास जिल्हा शल्यचिकित्सका गलांडे यांनी व्यक्त केला.