महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

डब्ल्यूएचओने रुग्णांवरील हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचे ट्रायल थांबवले - who stops trial of this medicines

जागतिक आरोग्य संघटनने हायड्रोक्सिक्लोरोक्वीन, लोपिनवीर आणि रिटोनवीर या औषधांचे रुग्णांवरील ट्रायल थांबवले आहे. एचआयव्ही किंवा एड्सच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱया हायड्रोक्सिक्लोरोक्वीन, लोपिनवीर आणि रिटोनवीर या औषधाचे निरक्षण करणाऱ्या समितीची शिफारस मान्य करण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटना
जागतिक आरोग्य संघटना

By

Published : Jul 5, 2020, 12:19 PM IST

जिनेव्हा - जागतिक आरोग्य संघटनने हायड्रोक्सिक्लोरोक्वीन, लोपिनवीर आणि रिटोनवीर या औषधांचे रुग्णांवरील ट्रायल थांबवले आहे. इतर उपचारांच्या तुलनेत या औषधांमुळे कोरोना रूग्णांच्या मृत्यू दरात किंचित किंवा नगण्य घट झाल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले.

एचआयव्ही किंवा एड्सच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱया हायड्रोक्सिक्लोरोक्वीन, लोपिनवीर आणि रिटोनवीरर या औषधाचे निरक्षण करणाऱ्या समितीची शिफारस मान्य करण्यात आली आहे. अलीकडेच, अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) ने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या प्रभावीतेचे मूल्यांकन करण्यासाठी चालू असलेल्या क्लिनिकल चाचण्या थांबविल्या होत्या.

एनआयएचने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, हे औषध रुग्णालयात दाखल कोरोना विषाणूच्या रुग्णांना फारसे फायदेशीर नाही. त्यामुळे रुग्णांवरील ट्रायल त्वरीत थांबवण्यात आले आहे, असे डब्ल्यूएचओने म्हटले.

दरम्यान हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन हे औषध कोरोनाच्या उपायासाठी परिणामकारक ठरत असल्याचे म्हटले होते. अनेक रुग्णांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आल्याचा दावा करण्यात आला होता. मलेरियासाठी वापरले जाणारे हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन हे औषध कोरोनाच्या रुग्णांसाठीही गुणकारी असल्याचे काही चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले होते. त्यावर मागणीनुसार भारताने या औषधाचा पुरवठा इतर देशांना केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details