नवी दिल्ली : चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी आशिया पॅसिफिकमध्ये नाटोसारखी लष्करी आघाडी स्थापन केल्याने या प्रदेशात संघर्ष निर्माण होईल, असे म्हटल्यावर अमेरिकेचे संरक्षण सचिव लायड ऑस्टिन यांनी सोमवारी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. अमेरिका इंडो - पॅसिफिकमध्ये नाटो स्थापन करण्याचा प्रयत्न करत नाही, असे ते म्हणाले. सोमवारी नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ऑस्टिन यांनी पत्रकार परिषदेत ही टिप्पणी केली.
चीनच्या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यावर उत्तर दिले : अमेरिकेचे संरक्षण सचिव सिंगापूरहून 4 जून रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. सेक्रेटरी ऑस्टिन यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. या आधी मार्च 2021 मध्ये ते भारतात आले होते. चीनच्या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यावर माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नाटो बद्दल माहिती दिली.
आम्ही इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नाटो स्थापन करण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही हा प्रदेश मुक्त आणि खुला राहील जेणेकरून वाणिज्य समृद्ध होऊ शकेल आणि विचारांची देवाणघेवाण सुरू राहील, हे सुनिश्चित करण्यासाठी समविचारी देशांसोबत काम करत आहोत. - लायड ऑस्टिन, अमेरिकेचे संरक्षण सचिव
चीनच्या संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य : सिंगापूरमध्ये रविवारी झालेल्या एका सुरक्षा परिषदेत चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू म्हणाले की, 'आशिया - पॅसिफिकमध्ये नाटो सारख्या युतीसाठी प्रयत्न करणे हा या क्षेत्रातील देशांचे अपहरण करण्यासारखे आणि क्षेत्रात संघर्षांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे.' विशेष म्हणजे या परिषदेला अमेरिकेचे संरक्षण सचिव लायड ऑस्टिन देखील उपस्थित होते. तैवान सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि चिनी लष्करी जहाजे एकमेकांच्या जवळ आल्याच्या एका दिवसानंतर शांगफू यांनी हे वक्तव्य केले होते. अमेरिका हा ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासह ऑकसचा सदस्य आहे. तसेच अमेरिका क्वाडचा देखील सदस्य आहे, ज्यामध्ये जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. या प्रदेशात चीनच्या वाढत्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी या गटांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
भारत - अमेरिका भागीदारी महत्वाची : या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारत - अमेरिका भागीदारी मुक्त आणि नियमबद्ध इंडो - पॅसिफिक प्रदेश सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आम्ही क्षमता वाढवण्यासाठी आणि आमची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी अमेरिकेसोबत संपूर्ण डोमेनवर काम करण्यास उत्सुक आहोत, अस ट्विट त्यांनी केले.
हेही वाचा :
- Eastern Ladakh Row : भारत चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक, पूर्व लडाखमधून सैन्य मागे घेण्यावर झाली चर्चा