मॉस्को :रशियासाठी भाडोत्री सैनिक म्हणून काम करणारे वॅगनर मर्सेनरी प्रमुख येवगेनी प्रिगोझिन आणि रशियन सरकार यांच्यात तणाव वाढतो आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ताजी माहिती अशी आहे की, वॅगनरच्या सैन्याने मॉस्कोपासून सुमारे 500 किमी अंतरावर असलेल्या वोरोनेझ शहरातील लष्करी सुविधांवर नियंत्रण मिळवले आहे. पुतिन यांनी शनिवारी देशाला संबोधित केले. ते म्हणाले की, सैन्याविरुद्ध शस्त्रे उचलणारा प्रत्येकजण देशद्रोही आहे.
आमचा प्रतिसाद कठोर असेल :रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी सकाळी जनतेला संबोधित केले. लष्कराविरुद्ध शस्त्र उचलणारा प्रत्येकजण देशद्रोही असल्याचे ते म्हणाले. सध्याच्या बंडात सहभागी असलेल्या सर्वांना शिक्षा देण्याचे ते बोलले आहेत. 'आमचे उत्तर कठोर असेल', असे ते म्हणाले. पुतिन यांनी जाहीरपणे वॅगनर लढवय्यांवर कारवाई करण्याचे वचन दिले आहे. मात्र, पुतिन यांनी स्टोव्ह-ऑन-डॉनमधील परिस्थिती बिकट असल्याचे मान्य केले.
मॉस्कोमध्ये सुरक्षा वाढवली : रशियन सुरक्षा सेवेतील सूत्राच्या हवाल्याने कळले की, शुक्रवारी रात्री मॉस्कोमधील सरकारी इमारती, वाहतूक सुविधा आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मॉस्कोमध्ये इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मॉस्कोच्या रस्त्यावर लष्करी ट्रकही दिसले आहेत. यापूर्वी येवगेनी प्रीगोझिन यांनी आरोप केला होता की, रशियन सैन्याने त्यांच्या सैनिकांवर बॉम्बफेक केली आहे, ज्यामध्ये त्यांचे सैनिक मोठ्या संख्येने मारले गेले. त्यावेळी रशियन संरक्षण मंत्रालयाने प्रीगोझिनचे आरोप फेटाळून लावले होते.
वॅगनर सेनेचे प्रमुख का रागावले आहेत? : प्रीगोझिन हे गेल्या अनेक महिन्यांपासून रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि चीफ ऑफ द जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्यावर अक्षमतेचा आरोप करत आहेत. त्यांनी आरोप केला की, युक्रेनमधील लढाईदरम्यान दोघांनी वॅगनरच्या लढवय्यांना दारूगोळा आणि मदत देण्यास नकार दिला. गेल्या काही महिन्यांत रशियाचे संरक्षण मंत्री आणि प्रीगोझिन यांच्यातील वाद रशियाच्या देशांतर्गत संकटात बदलत असल्याचे दिसत आहे.
पहाटे दोन वाजता प्रीगोझिनचा पहिला संदेश : स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी पहाटे 2 वाजता, प्रीगोझिनने टेलिग्रामवर एक संदेश पोस्ट केला की त्यांचे सैन्य रोस्तोव्हमध्ये रशियन सैन्याशी लढत आहे. वॅगनर वॉरियर्स त्यांच्या मार्गात येणाऱ्या कोणालाही संपवण्यास तयार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रीगोझिनने सांगितले की, वॅगनरचे 25,000 सैनिक मॉस्कोच्या दिशेने येत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फुटेजमध्ये विविध लष्करी वाहनांचा ताफा दिसत आहे. काही वाहनांवर रशियाचे झेंडे फडकत होते. रोस्तोव-ऑन-डॉन मधील चॅनेलवरील फुटेजमध्ये लष्करी गणवेशातील सशस्त्र पुरुष शहरातील प्रादेशिक पोलिस मुख्यालयाजवळून फिरताना दिसले.
प्रिगोझिनने लष्करी उठाव नाकारला : प्रीगोझिनने नाकारले की तो लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. ते म्हणाले की, त्यांनी आपल्या सैनिकांना युक्रेनमधून रोस्तोव्हला आणले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रीगोझिनसोबत लष्करी ताफाही आहे, जो मॉस्कोपासून केवळ 1,200 किलोमीटर दूर आहे. रशियन स्थानिक अधिकार्यांनी सांगितले की, एक लष्करी ताफा रशियाच्या दक्षिणेकडील भागाला मॉस्कोशी जोडणाऱ्या मुख्य मार्गावर होता. रहिवाशांना या मार्गाचा अवलंब टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा :
- PM Modi US Visit : मोदींच्या अमेरिका भेटीतून भारताला काय मिळाले? जाणून घ्या
- Shehbaz Sharif Video : पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मुसळधार पावसात महिला अधिकाऱ्याची छत्री हिसकावली, व्हिडिओ व्हायरल
- Ginger Ale : मोदी दारू पीत नाहीत..तरीही बायडन यांनी ड्रिंकचा ग्लास दिला, जाणून घ्या