महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Firecrackers During Diwali In US : आता अमेरिकेतील दिवाळीही धडाक्यात! या राज्यात दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्यास परवानगी - उटाह अमेरिका दिवाळी फटाके

अमेरिकेतील 'उटाह' या राज्याने नागरिकांना दिवाळीत फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. सिनेटर लिंकन फिलमोर यांनी या विषयी मांडलेले विधेयक सार्वमताने मंजूर करण्यात आले आहे.

US
US

By

Published : Feb 7, 2023, 3:01 PM IST

न्यूयॉर्क : आता अमेरिकेतील भारतीयांची दिवाळी स्मरणीय ठरणार आहे. अमेरिकेतील उटाह राज्याच्या सिनेटमधील खासदारांनी एक विधेयक संमत केले आहे, ज्यानुसार आता राज्यात दिवाळी दरम्यान फटाके फोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

विधेयक सार्वमताने मंजूर : दक्षिण जॉर्डनमधील सिनेटर लिंकन फिलमोर यांनी मांडलेले सिनेट विधेयक 46 गेल्या आठवड्यात सार्वमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकात दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यास परवानगी दिली जाईल, असे नमूद आले. फिलमोर म्हणाले की, त्यांच्या मतदारसंघातील एका नागरिकाने त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या विधेयकाची कल्पना दिली. या विधेयकाला प्रतिनिधीगृहात जाण्यापूर्वी फक्त एका मताची आवश्यकता होती.

2007 पासून सणाला मान्यता : ते एका निवेदनात म्हणाले, 'मी उटाहच्या भारतीय समुदायाचे कौतुक करतो. त्यांच्या सर्व समुदायांना सोबत घेऊन जाण्याच्या तसेच हिंदू, जैन आणि शीख धर्मांबद्दलचे शिक्षण वाढवण्याच्या प्रयत्नांमुळे आमच्या राज्यात अधिक चांगल्या प्रकारे समज निर्माण होण्यास मदत झाली आहे. सिनेटर फिलमोर म्हणाले, हे विधेयक इतरांच्या संस्कृतींना मान्यता देते. हे बिल नजीकच्या भविष्यात उटाह सिनेटमध्ये तिसऱ्या वाचनासाठी अनुसूचित केले जाईल. 2002 मध्ये पहिल्यांदा व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली होती. 2007 मध्ये अमेरिकन सरकारने या सणाला अधिकृत मान्यता दिली होती. 2021 मध्ये हा सण फेडरल सुट्टी म्हणून घोषित करण्यासाठी यूएसमध्ये दिवाळी डे कायदा लागू करण्यात आला. यंदा दिवाळी १२ नोव्हेंबरला येणार आहे.

अप्सरा अय्यर हार्वर्ड लॉ रिव्ह्यूची अध्यक्षा : 136 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय अमेरिकन महिलेची हार्वर्ड लॉ रिव्ह्यूच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अप्सरा अय्यर या हार्वर्ड लॉ स्कूलमधील द्वितीय वर्षाच्या भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यीनीची प्रतिष्ठित हार्वर्ड लॉ रिव्ह्यूच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हार्वर्ड लॉ रिव्ह्यू ही सर्वात जुनी विद्यार्थी-संचालित न्यायविषयक शिष्यवृत्ती प्रकाशनांपैकी एक आहे. अय्यर हिच्यपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रुथ बडर गिन्सबर्ग आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या पदावर काम केले आहे. अप्सरा अय्यरने २०१६ मध्ये येल येथून अर्थशास्त्र, गणित आणि स्पॅनिश विषयात पदवी प्राप्त केली आहे. लॉ स्कूलमध्ये जाण्यापूर्वी अप्सरा अय्यरने 2018 मध्ये विद्यापीठाच्या कार्यालयात काम केले आहे.

हेही वाचा : Apsara Iyer Harvard : 136 वर्षांत प्रथमच भारतीय वंशाच्या व्यक्तीची हार्वर्ड लॉ रिव्ह्यूच्या अध्यक्षपदी निवड

ABOUT THE AUTHOR

...view details