महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिका: शिकागो येथे स्वातंत्र्यदिनाच्या परेडदरम्यान गोळीबार.. सहा जण ठार.. संशयित आरोपी अटकेत - अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन

लेक काउंटी मेजर क्राइम टास्क फोर्सचे प्रवक्ते क्रिस्टोफर कॉवेली यांनी सांगितले की, हल्लेखोराने परेडमधील सहभागींवर छतावरून गोळीबार ( US Independence Day Parade Shootout ) केला आणि रायफल जप्त करण्यात आली. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली ( mass shooting near Chicago Suspect detained ) आहे.

US Independence Day Parade Shootout
शिकागो येथे स्वातंत्र्यदिनाच्या परेडदरम्यान गोळीबार

By

Published : Jul 5, 2022, 9:28 AM IST

वॉशिंग्टन :शिकागोच्या हायलँड पार्कच्या उपनगरात ४ जुलैच्या परेडमध्ये सामूहिक गोळीबार ( US Independence Day Parade Shootout ) करणार्‍या संशयितास इलिनॉयमधील लेक फॉरेस्टजवळ ताब्यात घेण्यात आले ( mass shooting near Chicago Suspect detained ) आहे. या हल्ल्यात सहा जण ठार झाले असून, किमान 24 जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, संशयित रॉबर्ट ई क्रिमो III याला उत्तर शिकागोच्या अधिकाऱ्याने जाताना पाहिले. त्याने वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला होता. सीएनएनच्या म्हणण्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले आणि हायलँड पार्कमधील पोलिस विभागात आणण्यात येणार आहे.

अमेरिकेच्या शिकागो शहरातील हायलँड पार्कजवळ सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या परेडदरम्यान झालेल्या गोळीबारात किमान सहा जण ठार तर २४ जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. पोलीस संशयित हल्लेखोराचा शोध घेत होते. हल्लेखोराने एका इमारतीच्या गच्चीवरून गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :अमेरिकेतील केंटुकी राज्यात आंदोलनादरम्यान गोळीबार; एकाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details