महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

US Secretary Visit Israel : युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री तीन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर

US Secretary Visit Israel : 'हमास' दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलला पाठिंबा दर्शवण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. ब्लिंकन बुधवारी निघून गुरुवारी इस्रायलमध्ये दाखल होतील.

US Secretary Visit Israel
US Secretary Visit Israel

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 9:29 AM IST

वॉशिंग्टन US Secretary Visit Israel : 'हमास' दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलला पाठिंबा दर्शवण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन इस्रायलला भेट देणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली. ब्लिंकेन बुधवारी अमेरिकेतून निघतील आणि गुरुवारी इस्रायलला पोहोचतील. या दौऱ्यात इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांबद्दल ते शोक व्यक्त करतील. तसंच आपण इस्रायलच्या लोकांच्या पाठीशी ठामपणे असल्याचं जाहीर करतील, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या प्रसिद्धपत्रकात म्हटलंय.

अमेरिेकेचा इस्रायलला पूर्ण पाठिंबा : अमेरिकेनं यापूर्वीच इस्रायलला पूर्ण पाठिंबा जाहीर केलाय. अमेरिकेनं काल रात्री इस्रायलला दारूगोळा भरलेलं विमान पाठवलं तेव्हा याची प्रचिती पाहायला मिळाली. एवढंच नाही तर अमेरिकेनं आपली एक विमानवाहू युद्धनौका इस्रायलच्या आसपास पाठवली आहे. अमेरिका इस्त्रायलला मदत करण्यासाठी आपली दुसरी विमानवाहू युद्धनौकाही लवकरच पाठवू शकते, असं म्हटलं जातंय.

इस्रायल दौऱ्यात घेणार अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट : इस्रायल-हमास युद्धाच्या काळात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांचा इस्रायल दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितलं की, ब्लिंकन इस्रायलला पोहोचल्यानंतर अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांचा हा दौरा असेल. मिलर पुढं म्हणाले की, ब्लिंकन गुरुवारी इस्रायलला पोहोचणार आहेत. इस्रायलनंतर ब्लिंकन अन्य कोणत्या देशाला भेट देणार का, याबाबत परराष्ट्र विभाग लवकरच घोषणा करू शकतो, असंही मिलर यांनी म्हटलंय.

आतापर्यंत 1000 हून अधिक इस्रायलच्या नागरिकांचा मृत्यू : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात आतापर्यंत इस्रायलचे एक हजाराहून अधिक लोक मारले गेले आहेत. हमासच्या दहशतवाद्यांनी अनेक इस्रायली नागरिकांनाही ओलीस बनवलंय. या ओलीसांमध्ये अनेक अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलनंही गाझा पट्टीतील दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. गाझा सरकारच्या म्हणण्यानुसार, तिथं आतापर्यंत किमान 830 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालाय. तसंच 4,250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याशिवाय 1500 हून अधिक हमासचे दहशतवादीही मारले गेल्याची माहिती आहे.

हेही वाचा :

  1. Israel Palestine Conflict : हजारोंचा बळी गेल्यानं संयुक्त राष्ट्रसंघाला चिंता, इस्राईल-हमास युद्ध थांबविण्याचं केलं आवाहन
  2. Israel Hamas War : हमासच्या रॉकेट हल्ल्यात एक भारतीय महिला जखमी, दूतावासानं दिली प्रकृतीची अपडेट
  3. USA in Support of Israel : हमास इस्रायल युद्ध आणखी भडकणार! अमेरिकेची इस्रायलला 'ही' मोठी मदत

ABOUT THE AUTHOR

...view details