महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Mumbai terror Attack : 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या न्यायालयाकडून मंजुरी - तहव्वूर राणा प्रत्यार्पण अमेरिकन न्यायालय

मुंबईवरील हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्याच आहेत. यामधील आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकन सरकार भारताकडे सुपूर्द करणार आहे. एनआयकडून राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या न्यायालयाकडून मंजुरी
US court approves extradition

By

Published : May 18, 2023, 7:38 AM IST

वॉशिंग्टन: 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा लवकरच भारताच्या ताब्यात येणार आहे. त्याच्या भारतात प्रत्यार्पण करण्याच्या भारत सरकारच्या विनंतीला अमेरिकन न्यायालयाने परवानगी दिली आहे. 10 जून 2020 रोजी, भारताने तहव्वू राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्याची अमेरिकन सरकारला विनंती केली होती.

यापूर्वीच बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला होता. अमेरिकन न्यायालयाने भारत सरकारकडून सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांची पाहणी करण्यात आली. सुनावणीच्या वेळी झालेल्या युक्तिवादांचा विचार करत अखेर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. याबाबतचे न्यायालयीन आदेश कॅलिफोर्नियाच्या यूएस डिस्ट्रिक्ट कोर्ट सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या यूएस मॅजिस्ट्रेट न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी दिले आहेत. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबाकडून मुंबईवर २६/११ चा हल्ला झाला होता. या हल्ल्याची राष्ट्रीय तपास संस्थेकडून चौकशी करण्यात येत आहे. यामधील आरोपी असलेल्या तहव्वू राणाला भारताकडून सुपूर्द करावी, अशी भारताची आग्रही मागणी आहे. अमेरिकन न्यायालयाने या मागणीला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेकडून राणाला भारतात आणण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.

न्यायलयीन सुनावणीत काय झाले?अमेरिकन सरकारच्या सुनावणीत अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला, की पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन डेव्हिड कोलमन हेडली हा लष्कर-ए-तोयसाबासाठी काम करत होता. त्याचा बालपणीचा मित्र असलेल्या राणाला याची कल्पना होती. तरीही तो हेडलीला मदत करून दहशतवादी कारवायामध्ये सामील झाला. एवढेच नव्हे तर हेडली कोठे हल्ला करणार होता, त्याचे काय नियोजन होते, याची माहितीदेखील राणाकडे होती.

मुंबईवरील हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू- 26/11 मधील कटात राणाचा सहभाग असल्याने त्याचा गुन्हा दहशतवादी स्वरुपाचा आहे. दुसरीकडे राणाच्या प्रत्यार्पणाला त्याच्या वकिलांनी कडाडून विरोध केला. मात्र, कट रचण्याबाबतचे पुरावे पाहून न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला. मुंबईवरील 2008 च्या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन लोकांसह एकूण 166 लोक मारले गेले. 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 60 तासांहून अधिक काळ नागरिकांना ओलीस ठेवले होते. ताजसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करून दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांची हत्या केली होती.

हेही वाचा-

  1. MEA Slams US Report : धार्मिक हिंसाचारावरुन अमेरिकेच्या अहवालात भारतावर टीका, भारताने फेटाळला पक्षपाती अहवाल
  2. People Killed In Open Fired : मेक्सिकोत माथेफिरुचा नागरिकांवर अंदाधूंद गोळीबार, तीन नागरिकांचा बळी; दोन अधिकाऱ्यांसह नागरिक जखमी
  3. Imran Khan Bail : इम्रान खान यांना मोठा दिलासा, सर्व प्रकरणांमध्ये जामीन मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details