महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Indian Embassy San Francisco : लंडननंतर सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय दूतावासावर खलिस्तान्यांचा हल्ला, अमेरिकेकडून निषेध व्यक्त - सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय दूतावासावर हल्ला

लंडनमधील भारतीय दूतावासाच्या तोडफोडीनंतर खलिस्तान समर्थकांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला केला. अमेरिकेने या हल्याचा निषेध करत भारतीय राजदूतांच्या सुरक्षेची हमी दिली आहे.

Indian Embassy San Francisco
सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय दूतावास

By

Published : Mar 21, 2023, 2:15 PM IST

वॉशिंग्टन : सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा अमेरिकेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच अमेरिकेने दूतावासात काम करणार्‍या मुत्सद्दींची पूर्ण सुरक्षा करण्याचे देखील वचन दिले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या संदर्भात माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल : लंडनमधील भारतीय दूतावासाच्या तोडफोडीनंतर खलिस्तान समर्थकांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर (एसएफओ) हल्ला केला. त्यांनी कार्यालयाचा दरवाजा तोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी मात्र अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ वाणिज्य दूतावासाच्या बाहेरचा आहे पण तो कधीचा आहे याची देखील पुष्टी झालेली नाही.

आयएसआयवर संशय : फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज (FIIDS) ने रविवारी पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर - सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) वर संशय व्यक्त केला. एफआयडीडीएसने म्हटले आहे की, आम्हाला संशय आहे की शीख कट्टरतावादाला भडकावण्यामागे पाकिस्तानची आयएसआय असून ती खोटा प्रचार करून यासाठी निधी पुरवत आहे. लंडनमध्ये तसेच सॅन फ्रान्सिस्को मधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याने आम्ही घाबरलो आहोत. येथे काही कट्टरपंथी फुटीरतावाद्यांनी भारताच्या दूतावासावर हल्ला केला आहे.

'अमेरिकेत दहशतवादाला स्थान मिळू नये' :त्यांनी पुढे म्हटले की, या दोन्ही घटनांद्वारे असेच दिसून येत आहे की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स मधील भारतीय दूतावासांचे संरक्षण करण्यासाठी व्हिएन्ना करारानुसार वचनबद्धतेची पूर्तता करण्यात आपण अपयशी ठरत आहेत. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. आम्ही डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (DHS) सारख्या कायदा आणि सुव्यवस्था संस्थांना विनंती करू. ते म्हणाले की, एफबीआय आणि सीआयए हे सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहेत की अमेरिकेत दहशतवादाला स्थान आणि समर्थन मिळू नये.

हेही वाचा :Khalistani Protest In UK : लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान्यांचा हल्ला, भारताने ब्रिटीश राजदूताकडे मागितले स्पष्टीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details