बीजिंग -अमेरिकेच्या संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे नाराज ( Pelosi Taiwan visit china begin trade sanction ) झालेल्या चीनने बुधवारी बेटावरील नैसर्गिक वाळूची निर्यात थांबवण्याची घोषणा केली. सीजीटीएन न्यूजने चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचा ( China begin trade sanction on Taiwan ) हवाला देत हे वृत्त दिले आहे. बीजिंगच्या सततच्या सुरक्षा धोक्यांना न जुमानता यूएस हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी मंगळवारी तैवानमध्ये आल्या. पेलोसी यांची भेट एक चीन तत्त्वाचे आणि चीन-अमेरिका संयुक्त निवेदनातील तरतुदींचे गंभीर उल्लंघन असल्याचे बीजिंगने म्हटले आहे.
तैवान सामुद्रातील शांतता भंग होत आहे - चीन :या भेटीमुळे तैवान सामुद्रातील शांतता आणि स्थिरता गंभीरपणे खराब होत आहे आणि तैवानचे स्वातंत्र्य शोधणाऱ्या फुटीरतावादी शक्तींना चुकीचा संकेत पाठवत आहे, असे बीजिंगकडून सांगण्यात आले. पेलोसी मंगळवारी ताइपेमधे उतरल्यानंतर लगेचच त्यांनी तैवानच्या लोकशाहीला पाठिंबा देण्याच्या आपल्या देशाच्या अटल वचनबद्धतेची पुष्टी केली. ही भेट कोणत्याही प्रकारे स्वशासित बेटावरील सयुक्त राज्याच्या धोरणाच्या विरोधात नाही, असे पेलोसी म्हणाल्या.
..या वस्तूंवर निर्बंध - अमेरिकेच्या या निर्णयामुळे चिडलेल्या चीनने पेस्ट्री, शिजलेल्या पदार्थ आणि मिठाईचे उत्पादन करणाऱ्या अनेक तैवानी कंपन्यांवर आर्थिक निर्बंध आणि आयात निर्बंध जाहीर केले. मंगळवारी, चीनने तैवानच्या अनेक खाद्य कंपन्यांच्या उत्पादनांची आयात तात्पुरती थांबवली. तैवानच्या कृषी परिषदेने (सीओए) पुष्टी केली, फोकस तैवानने अहवाल दिला. तसेच, काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांमध्ये चहाची पाने, सुकामेवा, मध, कोको बीन्स आणि भाज्यांचे उत्पादक आणि सुमारे 700 मासेमारी जहाजांमधील कॅच यांचा समावेश असल्याची पुष्टी सीओएने केली आहे.