लंडन - इंग्लंडमध्ये 40 हून अधिक मंत्र्यांनी सरकारमधून राजीनामा दिला. त्यानी पंतप्रधान जॉन्सन यांना पद सोडण्यास सांगितले. त्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा देण्याचे ठरवले. त्यांनी नुकताच राजीनामा दिला. कंझर्व्हेटिव्ह पक्ष नवीन नेता निवडत असताना ते पदावर राहतील की नाही हे अजून स्पष्ट झाले नव्हते. नवीन नेता पंतप्रधान म्हणून शपथ घेईल. (UK Prime Minister Boris Johnson to resign )
बोरिस जॉन्सन नेतेपद सोडणार - अडचणीत सापडलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी अखेरीस कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतेपद सोडण्यास सहमती दर्शवली होती. डाउनिंग स्ट्रीटच्या वृत्तानुसार, नवीन टोरी नेत्यासाठी नेतृत्वाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जॉन्सन, तोपर्यंत प्रभारी राहतील जोपर्यंत नवीन नेता निवडण्याची प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये नियोजित असलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या परिषदेच्या वेळेपर्यंत पूर्ण होत नाही. त्यानी औपचारिकपणे राजीनामा दिल्याचे वृत्त आताच हाती आले आहे.
मंत्रिमंडळातील राजीनामासत्र -मंगळवारपासून त्यांच्या मंत्रिमंडळातील राजीनामासत्र सुरू होते. त्यानंतर त्यांनी नवनियुक्ती करण्यासही सुरुवात केली होती. आता या सगळ्याच गोष्टी हाताबाहेर जात असल्याचे बोरिस यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पदाचा राजिनामा देण्याचे ठरवले.