वॉशिंग्टन : बुधवारी अनेक ट्विटरवर वापरकर्त्यांना ट्विटरवरचा वापर करताना अडणींना सामोरे जावे लागले. यूजर्स ट्विटरवर कोणतेही ट्विट पोस्ट करू शकत नव्हते. बर्याच वापरकर्त्यांना एक नोटीफिकेशन आले. ज्यामध्ये तुम्ही ट्विट पाठवण्याची दैनिक मर्यादा ओलांडली आहे. असे लिहिण्यात आले होते. आम्ही तुमचे ट्विट अपलोड करू शकत नाही. त्याबद्दल माफी असे मॅसेज अनेकांना वापरकर्त्यांना प्राप्त झाले होते. त्याशिवाय तुम्ही याक्षणी बर्याच लोकांना फॉलो करण्यात असक्षम आहात संदेश पाठवू शकत नाही असे नोटीफिकेशन अनेकां ना प्राप्त झाले.
ट्विट शेड्यूलिंग फंक्शनचा वापर : वापरकर्त्यांनी त्यांच्या अडतचणी सांगताना असे म्हटले की, ते फक्त ट्विटरचे ट्विट शेड्यूलिंग फंक्शन वापरून ट्विट शेअर करू शकतात, असे त्यांना सूचीत करण्यात आले. गुरुवारी पहाटे 5 वाजेपर्यंत 9,000 हून अधिक ट्विटर वापरकर्त्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. काही वेळाने वापरकर्ते पुन्हा ट्विटट वापरण्यास सक्षम झाले. त्यानंतर अर्ध्या तासात तक्रारींच्या अहवालात घट दिसून आली. इलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारले आहे. त्यानंतर 2022 मध्ये निम्म्याहून अधिक कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले गेले. सध्या घडीला ट्विटरला विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. वापरकर्त्यांनी यापूर्वी अॅपच्या टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन टूलमध्ये त्रुटींची तक्रार केली आहे.