अंकारा ( तुर्की ) : तुर्कस्तान आणि सीरियाला धक्का बसलेल्या भूकंपातील मृतांची संख्या आता किमान 15,383 आहे. तुर्कस्तानमध्ये सोमवारी झालेल्या भूकंपानंतर 12,391 लोकांचा मृत्यू झाला आहे. 62,914 लोक जखमी झाले आहेत. अशी माहिती समोर येत आहे. तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सी एएफएडीने हवाला देऊन त्यसंबंधीचा अहवाल दिला आहे. सीरियामध्ये मृतांची एकूण संख्या आता 2,992 वर पोहोचली आहे. तर वायव्येकडील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांमध्ये 1,730 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय सरकारी नियंत्रित भागातील एकूण 1,262 लोकांचा मृत्यू झाला आहे. बंडखोर आणि सरकार-नियंत्रित अशा दोन्ही भागात सीरियातील जखमींची एकूण संख्या 5,108 वर पोहोचली आहे. तिथे सध्या अत्यंत वाईट परिस्थीती पहायला मिळत आहे. नागरिकांना कडक थंडीचा सामना करावा लागत आहे.
उणीवा असल्याचे स्पष्ट चित्र :तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी बुधवारी भूकंपात झालेल्या हानीवर प्रतिक्रीया दिला. काही गोष्टींमध्ये उणिवा असल्याची कबुली तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी दिली. हवामानाच्या परिस्थितीमुळे आणि भूकंपामुळे विनाशाच्या तीव्रतेत भर पडली आहे. सोमवारी भूकंपाच्या केंद्राजवळील आपल्या भेटीदरम्यान एर्दोगन यांनी ही टिप्पणी केली. अर्थात, उणिवा आहेत. परिस्थिती स्पष्ट दिसत आहे. अशा आपत्तीसाठी तयार राहणे शक्य नाही. आम्ही आमच्या कोणत्याही नागरिकांना बेफिकीरपणे उघड्यावर सोडणार नाही," असे तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी म्हटले आहे. निःसंशय, आमचे काम सोपे नाही. आतापर्यंत, लष्करी सैनिक, पोलीसांसह अनेक नागरिकांनी मदत केली. परिस्थीतीशी सामना करण्यासाठी लष्करी सैनिक, पोलीसांचे सैन्य असे एकूण 21,200 कर्मचारी कार्यरत आहेत.