महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

India Help Turkey : भूकंपाने संकटात सापडलेल्या तुर्कीला भारताचा मदतीचा हात, विमानाने साहित्य रवाना - तुर्कीला भारताची मदत

तुर्कीतील भूकंपग्रस्तांची मदत करण्यासाठी भारतातून मदतीची पहिली तुकडी रवाना झाली आहे. तुर्कीच्या भारतातील राजदूतांनी ट्विट करत भारताचे आभार मानले आहे.

India Help Turkey
तुर्कीला भारताची मदत

By

Published : Feb 7, 2023, 8:47 AM IST

Updated : Feb 7, 2023, 9:10 AM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या घोषणेनंतर काही तासांतच भारताने हवाई दलाच्या विमानात भूकंप मदत सामग्रीची पहिली तुकडी तुर्कीला पाठवली आहे. या शिपमेंटमध्ये तज्ज्ञ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल शोध आणि बचाव पथकासह पुरुष आणि महिला कर्मचारी, उच्च-कुशल श्वान पथके, वैद्यकीय पुरवठा, प्रगत ड्रिलिंग उपकरणे आणि मदत कार्यासाठी आवश्यक असलेली इतर महत्त्वपूर्ण साधने यांचा समावेश आहे.

तुर्कीच्या राजदूतांकडून आभार व्यक्त : परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत म्हटले की, 'भारताने मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण क्षमता कार्यान्वित केली आहे. एनडीआरएफची पहिली तुकडी विशेष प्रशिक्षित श्वान पथके, वैद्यकीय पुरवठा, ड्रिलिंग मशीन आणि इतर आवश्यक उपकरणांसह भूकंप मदत सामग्रीसह तुर्कीसाठी रवाना झाली आहे. भारतातील तुर्कीचे राजदूत फिरात सुनेल यांनी भारत सरकारच्या मदतीच्या प्रस्तावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, गरजेत मदत करणारा मित्रच खरा मित्र असतो.

मोदींचे ट्विट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भूकंपानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व शक्य मदत देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मोदींनी ट्विटमध्ये म्हटले की, 'तुर्कस्तानातील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि मालमत्तेच्या हानीमुळे मी दुःखी आहे. शोकग्रस्त कुटुंबियांना माझ्या सांत्वना. जखमी लवकर बरे होवोत'.

बचाव कार्यात अडथळे : तुर्कीमध्ये काल झालेल्या 7.8 तीव्रतेच्या भीषण भूकंपात आत्तापर्यंत 4000 हून अधिक लोक मारले गेले असून सुमारे 15,000 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. सीरियातील सरकारच्या ताब्यात असलेल्या भागात मृतांची संख्या 656 लोकांवर पोहोचली आहे, तर सुमारे 1,400 जखमी झाले आहेत. बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या वायव्य भागात, तेथे कार्यरत असलेल्या गटांनी सांगितले की तेथे किमान 450 लोक मरण पावले असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. तुर्कस्तानच्या हाते प्रांतात कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली बरेच लोक अडकले असून अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. भूकंपानंतर वाचलेल्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी सोमवारी रात्री उशीरा पर्यंत शोधमोहीम चालू होती. अधिकाऱ्यांच्या मते मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाऊस आणि कडक थंडीमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

हेही वाचा : Turkey Earthquake : तुर्कीच्या भूकंपातील मृतांचा आकडा 4000 वर पोहचला, थंडी आणि पावसामुळे मदत कार्यात अडथळे

Last Updated : Feb 7, 2023, 9:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details