बैरूत:तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये 13 नोव्हेंबरला झालेल्या भयावह बॉम्बस्फोटात सहा नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्लात 81 जण जखमी झाले होते. तुर्की सरकारने या हल्ल्यासाठी कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (PKK) आणि सीरियन कुर्दिश वायपीजी मिलिशिया संघटनेला जबाबदार धरले होते. दरम्यान, तुर्कीने उत्तर सीरियावर हवाई हल्ला करत, इस्तंबूलमधील हल्ल्याचा बदला घेतला आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense of Turkey) या हल्ल्याची अधिकृत माहिती दिली आहे.
Turkey Airstrikes: तुर्कीचा उत्तर सीरियावर हवाई हल्ला, इस्तंबूलमधील हल्ल्याचा बदला - Cross border operations
तुर्कीने शनिवारी उत्तर सीरिया (Turkey Airstrikes on Syria) आणि उत्तर इराकमधील प्रतिबंधित कुर्द दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या तळांवरूनच दहशतवाद्यांनी इस्तंबूलवरील दहशतवादी हल्ल्याची (Terrorist attack on Istanbul) योजना आखली होती, अशी माहिती आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense of Turkey) या हल्ल्याची अधिकृत माहिती दिली आहे.
सीरियाच्या ग्रामीण भागात हल्ले-ब्रिटन स्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सने अहवाल दिला की, तुर्कीने सीरियन सैन्यांच्या लष्करी तळांवर देखील हल्ला केला. यामध्ये एसडीएफ आणि सीरियन सैनिकांसह कमीतकमी 12 ठार झाले. वेधशाळेने सांगितले की तुर्कीच्या लढाऊ विमानांनी अलेप्पो, रक्का आणि हसकाहच्या ग्रामीण भागात सुमारे 25 हवाई हल्ले केले.
हल्ल्याचा व्हिडीओ समोर- तुर्की सरकारने एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणी दोन स्फोट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अचूक हल्ल्याने दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त झाल्याचे ट्विटमध्ये लिहिले आहे. तुर्कीने 2016 पासून सीरियामध्ये तीन मोठ्या क्रॉस-बॉर्डर ऑपरेशन्स (Cross border operations) सुरू केल्या आहेत. आणि उत्तरेकडील काही प्रदेश नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे.