महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Titan Submersible : टायटॅनिक जहाजाचा मलबा पाहण्यासाठी गेले अन् पाणबुडीमधील सर्व कोट्यधीश प्रवाशांचा मृत्यू

उत्तर अटलांटिकमध्ये टायटॅनिक जहाजाचा मलबा पाहण्यासाठी समुद्रात गेलेल्या सबमर्सिबलमधील लोकांना 96 तास पूरेल इतकाच ऑक्सीजन होता. यूएस कोस्ट गार्ड आणि मोहिमेमागील कंपनीने दिलेल्या अंदाजाच्या आधारे पानबुडी शोधण्याची आणि बचाव करण्याची अंतिम मुदत गुरुवारी सकाळी 6 ते 8 दरम्यान होती. यामुळे पानबुडीतील प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Titan Submersible
टायटन पाणबुडी

By

Published : Jun 23, 2023, 8:21 AM IST

Updated : Jun 23, 2023, 9:51 AM IST

बॉस्टन : अटलांटिक महासागरात बेपत्ता झालेले टायटन पाणबुडीमधील ऑक्सीजन संपल्याचा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे. कारण या पाणबुडीमधील ऑक्सीजन फक्त 96 तास पुरेल इतकाच शिल्लक होता. यामुळे या पाणबुडीतील साहसी प्रवाशी जिवंत असतील याची शक्यता धुसर झाली आहे. हे सर्व प्रवाशी अटलांटिक समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचा मलबा पाहण्यासाठी गेले समुद्रात गेले होते. टायटॅनिक जहाज 111 वर्षापूर्वी महासागरात बुडाले होते.

का केला साहसी प्रवास : बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचा मलबा पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीत ब्रिटीश अब्जाधीश हमिश हार्डिंग, ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश, फ्रेंच नौदलाचे दिग्गज पीएच नरगेओलेट आणि पाकिस्तानी व्यापारी शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान, जो फक्त 19 वर्षांचा आहे. तो स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठाचा विद्यार्थी, हे अडकलेले आहेत. हे साहसी प्रवाशी टायटॅनिक जहाजाचे भग्नावशेष पाण्यासाठी या पाणबुडीतून रविवारी सकाळी अटलांटिक महासागरात प्रवासासाठी रवाना झाले होते.

तज्ञांची भीती : एका वृत्तानुसार, जेथे शोध कार्य सुरू असलेल्या भागात पाणबुडीचे डेब्रीज सापडल्याचे युएस कोस्ट गार्डने सांगितले. बचाव पथके अटलांटिक महासागरात खोल समुद्रातील टायटन पाणबुडी शोधत होते. समुद्राच्या 22 फुट खोलीवर गेल्यास पाणबुडीतील विद्य़ुत शक्ती कमी झाली असावी. यामुळे CO2 या विषारी पातळी फिल्टर करण्यासाठी डिझाइन केलेले 'स्क्रबर्स' कदाचित आधीच बंद झाले असतील, असे तज्ञांनी सांगितले.

फक्त 1 टक्के शक्यता : दरम्यान, सबमर्सिबलवरील ब्रिटिश अब्जाधीश हॅमिश हार्डिंगसह इतर पाच पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. हे साहसी प्रवाशी सुरक्षितपणे असतील याची शक्यता फक्त एक टक्का होती. "जर पाणबुडी टायटॅनिकपर्यंत खाली गेली असेल, तर पाणबुडी सापडण्याची केवळ एक टक्का शक्यता असेल," असे तज्ज्ञाने माध्यामाला सांगितले होते. परंतु ही शक्यताही मावळली असून सर्व प्रवाशांचा मृत्यू झाले आहे. पाणबुडीच्या शोधार्थ विमाने, जहाजे, रिमोट-ऑपरेटेड अंडरवॉटर वाहने आणि यूएस नेव्हीच्या मालकीची एक विशेष सॅल्व्हेज सिस्टम तैनात करण्यात आली होती.

2 कोटीचा शुल्क : ओशनगेट एक्सपीडिशन्स कंपनी पर्यटकांना बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष दाखवत असते. दरम्यान टायटॅनिक जहाजाचा मलबा पाहण्यासाठी अनेकाजण उत्सुक असतात. जहाजाचा मलबा हा 3 हजार 800 मीटर खोलवर आहे. इतक्या खोलीत असलेला मलबा पाहण्यासाठी पर्यटक 2 कोटी रुपयांची शुल्क भरत असतात.

Last Updated : Jun 23, 2023, 9:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details