सेऊलउत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी गेल्या काही दिवसांपासून ( Supreme Leader of North Korea Kim Jong ) देशाच्या सामरिक आण्विक ऑपरेशन प्रशिक्षणाचे निरीक्षण केले. उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेने देशातील अज्ञात ठिकाणी क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची पाहणी करताना किमचे ( recent tactical nuclear drills ) फोटो प्रसिद्ध केले आहेत. यामधून त्यांनी अप्रत्यक्षपणे आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे.
उत्तर कोरियाने मंगळवारी एक मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा मारा केला. हे क्षेपणास्त्र जपानवरून जात असताना पॅसिफिक महासागरात कोसळले. ( Ballistic Missile Passes Over Japan ) जपान आणि दक्षिण कोरियाने ही माहिती दिली. उत्तर कोरियाने या भागातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना लक्ष्य करणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या चाचण्या तीव्र केल्याचे समजते.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेशी चर्चा : जपानी अधिकाऱ्यांनी ईशान्येकडील रहिवाशांना जवळपासच्या इमारती रिकामी करण्यासाठी 'जे-अलर्ट' जारी केला आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच असा 'अलर्ट' जारी करण्यात आला आहे. जपानच्या होक्काइडो आणि आओमोरी भागातील रेल्वे सेवा, ज्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या, आता पूर्ववत करण्यात आल्या आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा ( Japanche Pant President Fumio Kishida ) यांनी पत्रकारांना सांगितले की, उत्तर कोरियाने नुकत्याच केलेल्या चाचण्यांचा आपण तीव्र निषेध करतो. या परिस्थितीबाबत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जपानच्या मंत्रिमंडळाचे मुख्य सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी सांगितले की, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
किम जोंग हे माध्यमांपासून दूर गेल्यानंतर त्यांच्याविषयी नेहमीच चर्चांना उधाण सुरू होते. यापूर्वी ते कोमामध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यापूर्वीही किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत विविध अफवा परसण्यात आल्या होत्या. मात्र, सुंचॉन प्रांतामधील एका खत निर्मिती कारखान्याच्या उद्घाटनाला त्यांनी हजेरी लावल्यानंतर या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला होता.