महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

State dinner at White House : स्टेट डिनरच्या मैफीलीत पंतप्रधान मोदींनी केला विनोद, पहा व्हिडिओ - नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी गुरुवारी संध्याकाळी वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनरला हजेरी लावली. स्टेट डिनर दरम्यान उपस्थित पाहुण्यांना त्यांनी संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांचेही आभार मानले.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jun 23, 2023, 12:30 PM IST

State dinner at White House

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि जिल बायडेन यांनी आयोजित केलेल्या स्टेट डिनरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थिती लावली. या डिनर कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात मैफील रंगली. दोघांनी आनंदाने आणि उत्साहितपणे डिनरच्यावेळी मह्त्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि जो बायडेन यांची भेट किती फायदेशीर राहिले हे दोन्ही नेत्यांनी यावेळी सांगितले. या डिनर कार्यक्रमात वातावरण एकदम आनंदी होते. विनोद करत हसत आणि आभार व्यक्त हा स्टेट डिनर कार्यक्रम पार पडला.

व्हाईट हाऊसमधील अधिकृत डिनर दरम्यान उपस्थित लोकांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. भारतीय-अमेरिकनांनी अमेरिकेचा सर्वसमावेशक समाज आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय अमेरिकन लोकांनी मोठा प्रवास केला आहे. त्यांना अमेरिकेत नेहमीच मानाचे स्थान मिळाले आहे. त्यामुळे त्यांना पुढे जाण्याचे महत्त्वाचे बळ मिळाले. याबरोबर अमेरिकेचा सर्वसमावेशक समाज आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यात भारतीय अमेरिकन लोकांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे मोदी म्हणाले.

प्रत्येक दिवसागणिक भारतीय आणि अमेरिकन एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत आहेत. हॅलोविनला भारतातील मुले स्पायडरमॅन बनतात आणि अमेरिकेतील तरुण 'नाटू-नाटू'च्या तालावर नाचत असतात. अमेरिकेत बेसबॉल लोकप्रिय आहे, तरीही अमेरिकन आता क्रिकेटच्या प्रेमात पडू लागली आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी अमेरिकेचा संघ सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना यश मिळवावे अशी प्रार्थना करतो. -पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींनी रात्रीच्या मेजवानी आणि दौऱ्याला यशस्वी बनवण्या बदद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आभार मानले. माझा दौरा यशस्वी झाल्याबद्द्ल मी प्रथम महिला जिल बायडेन यांचे आभार मानतो. काल त्यांनी माझ्यासाठी घराचे दरवाजे उघडले. दोन्ही देशांतील लोकांच्या उपस्थितीने आजची संध्याकाळ खास बनली आहे. ती आमची सर्वोत मौल्यवान संपत्ती आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी क्वाड अधिवेशनाची आठवण करत बायडेन यांना त्यांच्या कामात शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी आणि बायडेन जेव्हा भेटले होते तेव्हा बायडेन यांनी मोदींना एक समस्या सांगितली होती. त्या समस्येवर बोलताना मोदी म्हणाले की, तुम्ही त्या नागरिकांशी जोडले जाण्यायस सक्षम होणार असल्याचे मोदी म्हणाले.

राष्ट्रपति बायडेन आणि जिल बायडेनने केला टोस्ट: प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ने राष्ट्रपति बाइडेन से उनके साथ टोस्ट में शामिल होने का अनुरोध किया. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान मोदी हे पेय पित असताना टोस्ट करणार होते तेव्हा मोदींनी जिल बायडेन यांनादेखील टोस्टसाठी बोलवले होते. पीएम मोदी म्हणाले की, आज रात्रीचे अजून एक काम बाकी आहे. कृपया आमच्या अद्भुत यजमानांना, राष्ट्रपती बायडेन आणि जिल बायडेन यांच्याशी टोस्ट करण्यासाठी माझ्यासोबत सामील व्हा. उत्तम आरोग्य, समृद्धी आणि आनंद, स्वातंत्र्य, समानता आणि भारत आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्यातील मैत्रीचे चिरंतन बंधनासाठी टोस्ट करुया.

मैत्रीच्या महान बंधाचा उत्सव : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये अधिकृत डिनरचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला. भारत आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्यातील मैत्रीच्या महान बंधाचा उत्सव साजरा केला जात असल्याचे बायडेन म्हणाले. व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनरदरम्यान जो बायडेन यांनी एक विशेष भाषण दिले. जील आणि मी आज पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत अत्यंत फलदायी वेळ घालवला. आज रात्री आम्ही भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचे महान बंधन साजरे करत आहोत. दोन्ही नेत्यांनी आज (स्थानिक वेळेनुसार) अधिकृत स्टेट डिनरला उपस्थित असताना त्यांच्यात झालेल्या यशस्वी भेटीचे कौतुकही केले.

गाण्यावरुन विनोद : जेवणाला सुरुवात करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन, जिल बायडेन यांनी टोस्ट केले. त्यावेळी पंतप्रधान मोदी आणि जो बायडेन यांच्यातील ट्युनिग दिसून आले. स्टेट डिनरसाठी साधरण 400 लोक जमले होते. या सर्वांना जेवण देण्याआधी दोन्ही नेत्यांनी टोस्ट केले. त्यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, मला माहिती आहे तुम्ही किती चांगला पाहुणचार करतात. तुमच्या पाहुणचाराने पाहुण्याला गाणे गाण्यास प्रवृत्त करत असतात. परंतु मला गाणे गाता येत नाही, असा विनोदही मोदींनी यावेळी केला. यावेळी त्यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांची आठवण केली. येओल हे एप्रिलमध्ये व्हाईट हाऊसच्या स्टेट डिनरला आले होते. त्यावेळी त्यांनी व्यासपीठावर येत सर्वांसाठी अमेरिकन पाईमधील गाणे गायले होते. त्या गाण्याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

अमेरिकन लोकांची मने जिंकली : भारत आणि अमेरिका यांच्यातील सखोल संबंध वाढवण्याच्या उद्देशाने मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी स्टेट डिनरवेळी बोलताना मोदींनी आपल्या विनोदात्मक अंदाजात लोकांना संबोधन केले. विनोदात्मक बोलण्याने त्यांनी अमेरिकेन लोकांची मने जिंकली. मोदी म्हणाले की, प्रत्येक दिवसागणिक भारतीय आणि अमेरिकन एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखत आहेत. आपण एकमेकांचे उच्चारण अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. एकमेकांची नावे व्यवस्थित उच्चारू शकतो, असे म्हणताच मैफिलीत हश्या पिकला.

हेही वाचा -

  1. India to Sign Artemis Accords : इस्त्रो नासा 2024 मध्ये लाँच करणार संयुक्त अंतराळ मोहीम, भारत आर्टेमिस अ‍ॅकॉर्डमध्ये होणार सामील
  2. PM Modi Speech : भारताचा तिरंगा आणि अमेरिकेचा ध्वज आकाशात उंच फडकत राहो, पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमधील भाषण गाजले

ABOUT THE AUTHOR

...view details