येमेन : येमेनची राजधानी साना येथे बुधवारी जकात वितरणाच्या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाली. एका हुथी सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, सनाच्या बाब अल-यामन जिल्ह्यात चेंगराचेंगरीत किमान 80 लोक मारले गेले आणि 100 हून अधिक जखमी झाले. येमेनची राजधानी साना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे, असे हुथी अधिकाऱ्यांनी गुरुवारी माध्यमांना सांगितले.
रमजानच्या निमित्ताने जकात वाटली :हुथी अधिकार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येबद्दल माहिती दिली. चेंगराचेंगरीशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती देण्याची परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिक माहिती देताना एका वृत्तसंस्थेच्या वार्ताहराने सांगितले की, ही घटना एका शाळेत घडली जिथे रमजानच्या निमित्ताने जकात वाटली जात होती. चेंगराचेंगरीनंतर आजूबाजूच्या परिसरात मोठा सुरक्षा दल तैनात करण्यात आले. हल्ल्यातील मृतांचे नातेवाईक त्यांच्या नातेवाईकांच्या शोधात घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखले जात होते.