कोलंबो-श्रीलंकेतील अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत अराकता निर्माण ( Srilanka crisis update ) झाली आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सार्वजनिक मालमत्तेची लूट करणाऱ्या किंवा नागरिकांना दुखापत करणाऱ्या कोणत्याही दंगलखोराला गोळ्या घालण्याचे आदेश सैन्य, हवाई दल आणि नौदलाच्या ( shoot on sight orders in Srilanka ) कर्मचार्यांना दिले. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी लोकांना हिंसा आणि सूडाची कृत्ये थांबवण्याचे आवाहन केल्यानंतर मंत्रालयाने हे आदेश काढले आहेत.
देशाच्या वाढत्या आर्थिक संकटावर त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणाऱ्या सरकारविरोधी निदर्शकांवर पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्या समर्थकांनी सोमवारी ( Mob attack on Mahinda Rajapaksa home ) हल्ला केला. त्यानंतर हिंसाचाराचा भडका उडाला. त्यात आठ जण ठार ( 8 killed in srilanka violence ) झाले. त्याचवेळी कोलंबो आणि इतर शहरांमध्ये झालेल्या हिंसाचारात 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. देशातील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा राजपक्षे यांनी सोमवारी ( Mahinda Rajapaksa resigned on Monday ) आपल्या पदाचा राजीनामा दिला.
दंगलखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश- राजधानी कोलंबोमध्ये लष्कराचे जवान तैनात करण्यात आले होते. महिंद्रा राजपक्षे यांच्या समर्थकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर देशव्यापी कर्फ्यू लागू करण्यात आला. संरक्षण प्रवक्त्याचा हवाला देत स्थानिक माध्यमाने म्हटले, की सार्वजनिक मालमत्तेची लूट करणाऱ्या किंवा सर्वसामान्यांना इजा करणाऱ्या दंगलखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाने तिन्ही दलाला दिले आहेत.
हिंसाचारात मृतांची संख्या आठ -श्रीलंकेत मंगळवारी सरकार समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या संघर्षात मृतांची संख्या आठ झाली आहे. तर जवळपास 250 लोक जखमी झाले आहेत. महिंद्रा राजपक्षे यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केला. अधिकाऱ्यांना राजधानीत सैन्य तैनात करण्यास भाग पाडले. त्यानंतर देशव्यापी कर्फ्यू लागू केला.