कोलंबो -आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ( Mahinda Rajapaksa Resigns ) आहे. राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याकडे पाठवला ( President Gotabaya Rajapaksa ) आहे. आपल्या राजीनाम्याबाबत महिंदा राजपक्षे यांनी ट्विट करुन स्वत: माहिती दिली आहे.
महिंदा राजपक्षे यांनी राजीनाम्यापूर्वी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, "श्रीलंकेतील नागरिकांना मी संयम बाळगण्याचे आवाहन करत आहे. लक्षात ठेवा हिंसा केवळ हिंसाचारला जन्म देते. आर्थिक संकटात आपल्याला समाधानाची गरज आहे. ज्याचे निराकरण करण्यासाठी येथील प्रशासन वचनबद्ध आहे."
शुक्रवारी श्रीलंकन मंत्रीमंडळाची बैठक पार पडली होती. त्यामध्ये राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात दुसऱ्यांदा आणीबाणी जाहीर केली. त्यानंतर महिंदा राजपक्षे यांच्या राजीमान्यासाठी सरकारवर दबाव वाढला होता. आणीबाणी आणि पंतप्रधानाच्या राजीनाम्यासाठी सरकाविरोधी कार्यकर्त्यांनी राष्ट्रपतीच्या निवास्थानाबाहेर निदर्शने केली. निदर्शन करणाऱ्यांवर लष्कराने कारवाई केली. या कारवाईत 23 लोक जखमी झाले आहेत.