कोलंबो (श्रीलंका): श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची अधिकृत माहिती दिली आहे ( Sri Lanka President Gotabaya Rajapaksa resignation ). राजपक्षे यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे राजीनामा देणार असल्याची माहिती पंतप्रधानांच्या मीडिया युनिटने कोलंबो गॅझेटमध्ये दिली आहे.
पदाचा राजीनामा देणार -शनिवारी, सभापती महिंदा यापा अबेवर्देना यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले की राष्ट्रपती 13 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा देतील. शनिवारी फोर्ट येथील राष्ट्रपती भवनात हजारो लोक घुसल्यानंतर राजपक्षे यांनी राजीनामा दिला. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान आपल्या पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. मात्र, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानांवर कब्जा केलेल्या आंदोलकांनी जोपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत आपण आपली घरे ताब्यात ठेवणार असल्याचा निर्वाळा दिला आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे तणाव वाढला -देशातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे तणाव वाढला आहे. गेल्या काही आठवड्यांत, इंधन स्टेशनवर व्यक्ती आणि पोलीस दलातील सदस्य आणि सशस्त्र दल यांच्यात अनेक चकमकी झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. हजारोच्या संख्येने जनता रांगेत उभी आहे. तासंतासच नव्हे तर दिवस-दिवसभर लोकांना रांगेत उभे राहावे लागत आहे.