कोलंबो: श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे ( president Gotabaya Rajapakksha ) यांनी राजीनामा देण्याची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी बुधवारी देश ( Sri Lanken President Left Country ) सोडला. गोटाबाया राजपक्षे मंगळवारी रात्री उशिरा मालदीवला ( Gotabaya Rajapakksha At Maldiva )पोहोचले. गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी कुटुंबासह स्वत:साठी सुरक्षा मागितली होती. गोटाबाया राजपक्षे यांनी अट ठेवत सांगितले होते की, त्यांना कुटुंबासह देशाबाहेर जायचे आहे. या प्रकरणात, सुरक्षित देशाबाहेर पडण्याची हमी दिली पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. 9 जुलै रोजी गोटाबाया यांनी 13 जुलै रोजी पदाचा राजीनामा ( Sri Lanken President Resign ) देणार असल्याची घोषणा केली होती. गोटाबया यांच्या राजीनाम्यावर एक दिवस आधी स्वाक्षरी झाली होती.
आज घोषणा करण्याची शक्यता :त्याच वेळी, डेली मिररनुसार, गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यात 13 जुलै ही तारीख लिहिली आहे. आता सभापती अभयवर्धने बुधवारी गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याची जाहीर घोषणा करतील. तीन दिवसांपूर्वी राष्ट्रपतींनी सभापतींना राजीनामा दिल्याची माहिती दिली होती. मात्र गेल्या दोन दिवसांत सभापतींशी झालेल्या संभाषणात राजीनाम्याचा उल्लेख नव्हता.