कोलंबो:श्रीलंकेतील ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे सरकारविरोधात सातत्याने निदर्शने होत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या निदर्शकांनी शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला चारही बाजूंनी घेराव ( Siege of President Gotabaya Rajapaksa residence ) घातला. त्यानंतर त्यांना घर सोडून पळून जावे लागले. त्याच वेळी, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे ( PM Ranil Wickremesinghe )यांनी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि जलद तोडगा काढण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच ते सभापतींना संसद बोलावण्याची विनंती करत आहेत.
श्रीलंकेतील सर्वोच्च वकील संघ, मानवाधिकार गट आणि राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर पोलिसांनी शनिवारी सरकारविरोधी निदर्शनांपूर्वी संचारबंदी उठवली, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. सरकारविरोधी निदर्शने ( Anti-government protests in Sri Lanka ) रोखण्यासाठी कोलंबोसह देशाच्या पश्चिम प्रांतातील सात विभागांमध्ये हा कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम प्रांतातील सात पोलिस विभागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ज्यात नेगोम्बो, केलानिया, नुगेगोडा, माउंट लॅव्हिनिया, नॉर्थ कोलंबो, दक्षिण कोलंबो आणि कोलंबो सेंट्रल यांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत हा कर्फ्यू लागू करण्यात आला.