नवी दिल्ली Ship Hijacked : सोमालिया जवळील अरबी समुद्रात एका व्यापारी जहाजाचं अपहरण करण्यात आलं होतं. या जहाजावर 15 भारतीय होते. भारतीय नौदलानं या जहाजाच्या अपहरणाच्या प्रयत्नाला चोख प्रत्युत्तर दिलंय. जहाजावरील 15 भारतीयांसह सर्व 21 क्रू मेंबर्सची सुटका करण्यात आली आहे. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यानं ही माहिती दिली.
सोमालियाच्या किनार्याजवळ अपहरण : या व्यापारी जहाजानं गुरुवारी सोमालियाच्या किनार्याजवळ अपहरणाची माहिती दिली होती. त्यानंतर भारतीय नौदलानं एक युद्धनौका तैनात केली. नौदलाच्या मरीन कमांडोंनी अपहरण केलेल्या जहाजावर चढून सर्वांची सुटका केली. INS चेन्नईनं 5 जानेवारीला दुपारी तिच्या चाचेगिरीविरोधी दलाला जहाजाकडे वळवलं. यासह मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट, प्रीडेटर MQ9B आणि हेलिकॉप्टरनं हायजॅक झालेल्या जहाजावर सतत देखरेख ठेवण्यात येत होती.
INS चेन्नईला जहाजाकडे वळवलं : 'एमव्ही लिला नॉरफोक' MV Lila Norfolk या मालवाहू जहाजाचं अपहरण झाल्याची माहिती गुरुवारी यूके मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स (यूकेएमटीओ) या ब्रिटीश लष्करी संस्थेनं दिली. ही संस्था मोक्याच्या जलमार्गांवरील जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवते. भारतीय नौदलाच्या मिशन तैनात प्लॅटफॉर्मनं या इशाऱ्याला तत्परतेनं प्रतिसाद दिला. जहाजानं गुरुवारी संध्याकाळी सुमारे पाच ते सहा अज्ञात सशस्त्र कर्मचार्यांनी बोर्डिंगचा संकेत देणारा संदेश UKMTO पोर्टलवर पाठवला. याला प्रतिसाद देत, भारतीय नौदलानं सागरी गस्त सुरू केली. नौकेला मदत करण्यासाठी सागरी सुरक्षा ऑपरेशन्ससाठी तैनात असलेल्या INS चेन्नईला जहाजाकडे वळवण्यात आलं.
चार युद्धनौका अरबी समुद्रात तैनात :भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी अरबी समुद्रात कार्यरत असलेल्या भारतीय युद्धनौकांना चाच्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या भागातील व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एमव्ही लीला नॉरफोक' या जहाजाचं अपहरण झाल्याची माहिती गुरुवारी संध्याकाळी मिळाली. सोमालियाच्या किनाऱ्यावर अपहरण करण्यात आलेल्या या जहाजावर लायबेरियाचा ध्वज होता.
हे वाचलंत का :
- इराणमध्ये जनरल सुलेमानी यांच्या कबरीजवळ भीषण स्फोट, 100 हून अधिक जणांचा मृत्यू