कोलंबो Shubhman Gill on Pakistan Pace Attack :आशिया चषकाच्या (asia cup 2023) सुपर-४ फेरीतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिलनं एक विधान केलय. भारतीय फलंदाजांना पाकिस्तानच्या वेगवान त्रिकुटाचा सामना करण्याची सवय नाही. यामुळे भारतीय फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजीवर अडखळतात, असं गिलनं म्हटलय. कोलंबो येथे उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुपर-४ सामना रंगणार आहे. (india vs pakistan super 4)
पाकिस्तानचे गोलंदाज खूप वेगळे : रविवारी पाकिस्तानविरुद्ध (india vs pakistan) खेळल्या जाणाऱ्या सुपर स्टेज सामन्यापूर्वी गिल म्हणाला, आम्ही इतर संघांविरुद्ध जितके सामने खेळतो तितके पाकिस्तानविरुद्ध खेळत नाही. आफ्रिदीच्या आत येणा-या चेंडूंवर भारतीय आघाडीच्या फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की, हे गोलंदाजी आक्रमण खूप चांगले आहे. जेव्हा आपण अशा गोलंदाजीविरुद्ध खेळत नाही तेव्हा मोठ्या स्पर्धांमध्ये थोडा फरक पडतो. भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ विश्वचषक आणि आशिया चषक यांसारख्या स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. शाहीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी डाव्या हाताच्या थ्रो-डाउन स्पेशालिस्ट विरुद्ध सराव केल्याचं गिलनं सांगितलं. गिल पुढे म्हणाला, 'पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज खूप वेगळे आहेत. त्यांची स्वतःची शैली आहे. शाहीन चेंडू खूप स्विंग करतो. नसीम शाह वेगावर लक्ष केंद्रित करतो आणि त्याला पिचकडून मदत मिळवायला आवडते. ते वेगवेगळ्या परिस्थितीत फलंदाजाला वेगवेगळी आव्हने देतात. गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही वर्चस्व गाजवावे लागेल, असंही गिल म्हणाला. पाकिस्तानविरुद्ध साखळी सामन्यात भारताने 66 रन्समध्ये चार विकेट गमावल्या होत्या. यावर गिल म्हणाला, 'सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून वर्चस्व गाजवायला हवे.'