शिकागो : येथील एका चर्चबाहेर अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या तीन जणांवर शनिवारी दुपारी एका हल्लेखोराने गोळीबार ( Three people shot outside church in Chicago ) केला. पोलिसांनी ही माहिती दिली. शिकागो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही पीडितांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती ठीक आहे. 'द सन-टाइम्स'च्या वृत्तानुसार, दुपारी 2.30 च्या सुमारास एक व्यक्ती कारमध्ये आला आणि त्याने अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या लोकांवर गोळीबार केला.
Firing at funerals : शिकागोमध्ये अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या तीन लोकांवर गोळीबार - रोझलँडमधील युनिव्हर्सल कम्युनिटी मिशनरी बॅप्टिस्ट चर्च
अमेरिकेतील शिकागो येथे एका चर्चबाहेर एका हल्लेखोराने तीन जणांवर गोळीबार ( Shooting outside a church in Chicago ) केला. पीडितांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे लोक शिकागोमधील दक्षिण बाजूला असलेल्या रोझलँडमधील युनिव्हर्सल कम्युनिटी मिशनरी बॅप्टिस्ट चर्चच्या ( Universal Community Missionary Baptist Church Roseland ) बाहेर फोटो काढत होते. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून त्यात 20 वर्षीय व्यक्तीच्या पोटात, 37 वर्षीय व्यक्तीच्या मांडीला आणि एका 25 वर्षीय व्यक्तीचा पाठीत गोळी लागली आहे. साक्षीदार करीम हाऊसने वृत्तपत्राला सांगितले की, तो त्याचा चुलत भाऊ माईक नॅशच्या अंत्यविधीला उपस्थित होता. हाऊसने सांगितले की, नॅश हा एक हिंसाविरोधी कार्यकर्ता होता ज्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गोळीबार प्रकरणी तात्काळ अटक करण्यात आलेली नाही.
हेही वाचा -UN Court : आयसीजेने म्यानमारचे दावे फेटाळले, रोहिंग्या प्रकरणाची होणार सुनावणी