बोगोटा : नैऋत्य कोलंबियातील एका तुरुंगात सोमवारी आग ( Prison fire in southwest Colombia ) लागल्याची घटना घडली. या लागलेल्या आगीत 49 जणांचा ( Prison fire kills 49 ) मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर डझनहून अधिक जण जखमी झाले आहेत.
राष्ट्रीय तुरुंग प्रणालीचे संचालक टिटो कॅस्टेलानोस यांनी रेडिओ कॅराकोलला सांगितले की मृतांमध्ये किती कैदी आहेत हे स्पष्ट नाही. तुलुआ शहरातील मध्यम-सुरक्षा तुरुंगात दंगलीच्या प्रयत्नात सोमवारी सकाळी आग लागली, असे त्यांनी सांगितले.