महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Bilal Al Sudani Killed : अमेरिकेच्या लष्करी कारवाईत आयएसआयएसचा वरिष्ठ नेता बिलाल सुदानी ठार - अमेरिकेचा सोमालियात हल्ला

अमेरिकेने आयएसआयएसचा कट्टर दहशतवादी बिलाल-अल-सुदानी याचा सोमालियात एका ऑपरेशनमध्ये खात्मा केला आहे. बिलाल-अल-सुदानी याने आफ्रिकेत आयएसआयएसला प्रोत्साहन देण्यात आणि त्याच्या जागतिक नेटवर्कचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Bilal Al Sudani Killed
बिलाल सुदानी ठार

By

Published : Jan 27, 2023, 10:18 AM IST

वॉशिंग्टन : उत्तर सोमालियामध्ये अमेरिकेच्या दहशतवादविरोधी कारवाईत इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) चा वरिष्ठ नेता बिलाल-अल-सुदानी ठार झाला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी गुरुवारी एका निवेदनात याबाबत पुष्टी केली आहे. अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या आदेशानुसार केलेल्या या ऑपरेशनमध्ये इतर अनेक आयएसआयएसच्या अतिरेक्यांना मारण्यात आले आहे. या ऑपरेशनमध्ये कोणत्याही नागरिकांना इजा झाली नाही.

ISSI चा आफ्रिकेत वाढता प्रभाव : राष्ट्रपतींच्या आदेशानुसार 25 जानेवारी रोजी अमेरिकेच्या सैन्याने उत्तर सोमालियामध्ये आयएसआयएस विरोधी कारवाई केली. या कारवाईत सोमालियातील आयएसआयएसचा प्रमुख बिलाल-अल-सुदानी याच्यासह अनेक आयएसआयएस सदस्यांचा मृत्यू झाला. अल-सुदानी आफ्रिकेत आयएसआयएसच्या वाढत्या प्रभावाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अफगाणिस्तानसह जगभरातील दहशतवादी गटाच्या कारवायांना निधी पुरवण्यासाठी जबाबदार होता. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकृत प्रकाशनाने ऑस्टिनचा हवाला दिला आहे. हे ऑपरेशन युनायटेड स्टेट्स आणि तिचे साथिदार देश यांना जागतिक दहशतवादाच्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी महत्वाचे होते. या ऑपरेशनमध्ये कोणत्याही नागरिकांना इजा झाली नाही. या दहशतवादविरोधी ऑपरेशनला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आमचे गुप्तचर विभाग तसेच इंटरपोल यांचे आभार मानतो, असे लॉइड ऑस्टिन यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे या पूर्वीही कारवाई : गेल्या वर्षाच्या अखेरीपूर्वी, अमेरिकन सैन्याने सीरियामध्ये हवाई हल्ला केला होता ज्यामध्ये दोन वरिष्ठ आयएसआयएस अतिरेक्यांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, सोमालियामध्ये आजपर्यंत लष्करी कारवायांमध्ये केवळ अल-शबाबच्या लढवय्यांकडे लक्ष दिले गेले आहे, जो या क्षेत्रातील प्रबळ दहशतवादी गट आहे. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अल-शबाबच्या प्रशिक्षण शिबिरात परदेशी लढवय्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आणि निधी पुरवल्याबद्दल अल-सुदानीला 2012 मध्ये यूएस ट्रेझरीकडून मंजुरी मिळाली होती.

इस्लामिक स्टेटपासून अमेरिकेला धोका : अफगाणिस्तानातून इस्लामिक स्टेटला परतावून लावण्यासाठी अमेरिकन सैनिकांनी तालिबानी बंडखोरांची मदत घेतली होती. आता अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर याचा बदला इस्लामिक स्टेटकडून घेतला जाऊ शकतो. त्यामुळेच इस्लामिक स्टेटपासून अमेरिकेला धोका असल्याचे तेथील प्रशासनाला वाटते. अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्य माघारीनंतर इस्लामिक स्टेटवर निगराणी ठेवणे आणि त्यांच्या हल्ल्याच्या नियोजनांबद्दल माहिती मिळणे कठीण झाले आहे. अमेरिका जगभरात ज्या दहशतवादी संघटनांशी लढत आहे, त्यापैकी इस्लामिक स्टेटचे आव्हान मोठे असल्याचे बायडेन प्रशासनाला वाटते. त्यामुळे हा हल्ला अमेरिकेचे या संघटनेविरुद्ध एक मोठे यश मानले जात आहे.

हेही वाचा :US strike in Somalia : अमेरिकेचा सोमालियामध्ये हवाई हल्ला, अल शबाबचे 30 दहशतवादी ठार

ABOUT THE AUTHOR

...view details