लंडन- भारतात जन्मलेले माध्यमातील दिग्गज पत्रकार अशी ओळख असलेल्या डॉ. समीर शाह यांची बीबीसीच्या चेअरमन पदी निवड झाली. त्यांनी 40 वर्षांहून अधिक काळ इंग्लंडमधील माध्यमात काम केले. यापूर्वीच डॉ. समीर शाह यांना यूके सरकारचे पसंतीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते.
समीर शाह यांनी औपचारिकपणे पदभार स्वीकारण्यापूर्वी हाऊस ऑफ कॉमन्स मीडिया कल्चर, मीडिया आणि स्पोर्ट सिलेक्ट कमिटीच्या क्रॉस-पार्टी खासदारांद्वारे नियुक्तीपूर्व छाननीसाठी चौकशी केली जाईल. समीर शाह यांचा जन्म जानेवारी 1952 मध्ये औरंगाबादमध्ये झाला. ते 1960 मध्ये इंग्लंडला गेल्यानंतर तिथेच शिक्षण आणि नोकरी केली. त्यांनी पश्चिम लंडनमधील लेटिमर अप्पर स्कूल या स्वतंत्र शाळेत शिक्षण घेतले. तर हल विद्यापीठातून भूगोल विषयात पदवी घेतली आहे.
संधी मिळणं हा सन्मान-समीर शाह यांचे बीबीसीच्या चेअरमन पदाच्या शर्यतीत नाव होते. तेव्हा समीर यांनी प्रतिक्रिया दिली होती. तेव्हा शाह म्हणाले, की बीबीसी ही जागतिक संस्कृतीत मोठे योगदान देत आहेत. माझ्या कारकीर्दीत या संस्थेला भेडसावणाऱ्या जटिल समस्यांवर मात करण्यासाठी संधी मिळणं हा सन्मान असेल. बीबीसीचं ब्रिटीश लोकांच्या जीवनात महत्त्वाचं स्थान आहे. संपूर्ण देशभरातील प्रेक्षकापर्यंत पोहोचण्याचं आमचं कर्तव्य आहे. वाढत्या स्पर्धात्मक प्रेक्षकांची गरज पूर्ण करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.