लंडन :सध्यायूकेमध्ये राजकीय गोंधळ ( Political Crises in The UK ) सुरू आहे. माजी कुलपती ऋषी सुनक पुढील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर ( Rishi Sunak leads UK PM race ) आहेत. त्यांना आत्तापर्यंत सर्वात जास्त मते मिळाली आहेत. 100 खासदारांचे समर्थन मिळविण्याच्या उंबरठ्यावर ते पोहोचले ( Rishi Sunak Will get 100 MPs support ) आहेत. असे एका मीडिया रिपोर्टमध्ये शनिवारी म्हटले आहे. आतापर्यंत, सुनक यांना कंझर्व्हेटिव्ह खासदारांकडून 93 खासदारांचे समर्थन मिळाले आहेत.
बोरिस जॉन्सन दुसऱ्या स्थानावर :माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन 44 खासदारांच्या समर्थनासह दुसऱ्या स्थानावर आहेत. सनक आणि जॉन्सन यांनी अद्याप अधिकृतपणे लिझ ट्रस यांच्यानंतरच्या स्पर्धेतील त्यांच्या बोली घोषित केल्या नाहीत. त्यांनी केवळ 45 दिवसांच्या कार्यालयानंतर गुरुवारी सरकारच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला. इतिहासातील सर्वात कमी कालावधी ( united kingdom political situation ) आहे.