महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Vivek Ramaswamy : वंश, लिंग आणि हवामानामुळे अमेरिका अडचणीत आली आहे - विवेक रामास्वामी - रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार विवेक रामास्वामी वॉशिंग्टनमध्ये एका वार्षिक कार्यक्रमाला संबोधित करत होते. यावेळी आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी अमेरिकेला अडचणीत आणलेल्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

Vivek Ramaswamy
विवेक रामास्वामी

By

Published : Mar 5, 2023, 3:15 PM IST

वॉशिंग्टन : रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची दावेदारी करणारे विवेक रामास्वामी म्हणाले की, वंश, लिंग आणि हवामान या तीन मुद्द्यांमुळे आज अमेरिका अडचणीत सापडली आहे. ते असेही म्हणाले की, 2024 मध्ये ते देशाचे अध्यक्ष झाले तर ते अमेरिकन कंपन्यांना चीनसोबत व्यवसाय करण्यास बंदी घालतील आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) देखील बरखास्त करतील.

चीनपासून स्वातंत्र्याची घोषणा : आजची स्वातंत्र्याची घोषणा ही आमची चीनपासूनची स्वातंत्र्याची घोषणा आहे, असे 37 वर्षीय रामास्वामी यांनी रिपब्लिकन पक्षाच्या सर्वोच्च वार्षिक कार्यक्रम कंझर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अ‍ॅक्शन कॉन्फरन्स (CPAC) येथे आपल्या भाषणात सांगितले. जर आज थॉमस जेफरसन जिवंत असते तर त्यांनी या घोषणेवर स्वाक्षरी केली असती. जर मी तुमचा पुढचा अध्यक्ष झालो तर मी त्यावर सही करेन, असेही ते म्हणाले.

'अमेरिका फर्स्ट' ने प्रेरित : CPAC च्या राष्ट्रीय व्यासपीठावरून आपल्या पहिल्या प्रमुख भाषणात रामास्वामी म्हणाले की, ते माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि 'अमेरिका फर्स्ट' च्या त्यांच्या दृष्टीपासून प्रेरित आहेत. या समस्या ओळखून त्यांच्यासाठी आक्रमकपणे काम करण्याची हीच वेळ असल्याचे ते म्हणाले. रामास्वामी यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी होण्याची घोषणा केली होती. आपल्या 18 मिनिटांच्या भाषणात ते म्हणाले की, 'तीन धर्मनिरपेक्ष मुद्द्यांनी आज अमेरिकेला अडचणीत आणले आहे.' ते म्हणाले, 'तुमचा वर्ण काळा असेल तर तुमची जन्मजात गैरसोय आहे. जर तुम्ही गोरे असाल तर तुमची आर्थिक पार्श्वभूमी किंवा संगोपन काहीही असो, तुम्हाला जन्मजात विशेषाधिकार आहे. तुम्ही कोण आहात आणि काय मिळवू शकता हे तुमचा वर्ण ठरवतो.'

अमेरिका राष्ट्रीय अस्मितेच्या संकटात सापडली आहे : रामास्वामी म्हणाले की, अमेरिका राष्ट्रीय अस्मितेच्या संकटात सापडली आहे. रामास्वामी यांनी आपल्या भाषणात शिक्षण विभाग आणि एफबीआय रद्द करण्याची मागणीही केली. ते म्हणाले, मी गेल्या आठवड्यात सांगितले होते, अमेरिकेतील पहिली एजन्सी जी बंद करावी लागेल ती म्हणजे शिक्षण विभाग. तिचे अस्तित्व असण्याचे कारण नाही. रामास्वामी पुढे म्हणाले, 'आणि आज मी या देशातील दुसरी सरकारी एजन्सी बंद करण्याची घोषणा करण्यास तयार आहे, जे आपण किमान 60 वर्षांपूर्वी करायला हवे होते. FBI रद्द करण्याची वेळ आता आली आहे'.

हेही वाचा :Indian Urinating In Flight : भारतीयाने केली अमेरिकन एअरलाइनच्या विमानात लघुशंका!

ABOUT THE AUTHOR

...view details