युनायटेड नेशन्स: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त करत भारताने म्हटले आहे की, शहरी भागातील महत्त्वाच्या नागरी जागा लढाईत सोपे लक्ष्य बनत आहेत. मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ( UN Security Council ) युक्रेनच्या मुद्द्यावर भारताचे स्थायी उपप्रतिनिधी आर. रवींद्र म्हणाले, या युद्धामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून विशेषत: महिला, लहान मुले आणि वृद्धांसाठी समस्या निर्माण झाल्या आहेत.
ते म्हणाले की लाखो लोक बेघर झाले आहेत आणि त्यांना शेजारच्या देशांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. राजनैतिक आणि शांतता राखण्यासाठी उपसचिव रोझमेरी डी कार्लो यांनी परिषदेला सांगितले की, युक्रेनच्या क्रेमेनचुक शहरातील मॉलवर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात ( Russian missile attack on Kremenchuk Mall ) 18 नागरिक ठार आणि 59 जखमी झाले. हा आकडा वाढू शकतो, असे ते म्हणाले.