महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Queen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी पीएम मोदींशी केले होते 'खास' हस्तांदोलन, 'असे' आहे वेगळेपण - shake hands without gloves with Modi

राणी एलिझाबेथ II ने ( longest reigning monarch of Britain ) राष्ट्रप्रमुखांसह मान्यवरांशी हस्तांदोलन करताना अनेकदा त्यांचे हातमोजे घातलेले असायचे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हस्तांदोलन ( Elizabeth II shaking hands ) करताना त्या हातमोज्याशिवाय दिसल्या होत्या. त्या पंतप्रधान मोदींना ( Queen Elizabeth II and Narendra Modi ) दोनदा भेटल्या आणि दोन्ही वेळा हातमोजे न घालता हस्तांदोलन केले. ( Handshake with PM Modi was unique )

longest reigning monarch of Britain
जास्त काळ राज्य करणाऱ्या राणी

By

Published : Sep 12, 2022, 11:19 AM IST

दिल्ली : ब्रिटनमधील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय ( longest reigning monarch of Britain ) यांचे गुरुवारी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे निधन झाले. त्यांचा पेहराव आणि स्वभाव अद्वितीय होता. ड्रेस आणि त्याचे रंग, टोपी आणि पिशवी याशिवाय हातमोजे घालण्याचीही त्यांची वेगळी शैली होती. हातमोजेशिवाय त्या क्वचितच दिसायच्या. हातमोजे न घालता लोकांशी हस्तांदोलन करणंही दुर्मिळ होतं. राणी एलिझाबेथ अनेकदा राष्ट्रप्रमुखांसह मान्यवरांशी हस्तांदोलन करताना त्यांचे हातमोजे घालत असत. त्यांंच्या हयातीत त्यांनी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, आयके गुजराल, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी ( Queen Elizabeth II and Narendra Modi ) यांच्यासह पाच भारतीय पंतप्रधानांची भेट घेतली. ( Handshake with PM Modi was unique )

पंतप्रधान मोदींच्या राणींसोबत संस्मरणीय भेटी : यादरम्यान एक खास बाब समोर आली आहे. राणी पीएम मोदींशिवाय इतर पंतप्रधानांशी हस्तांदोलन करताना हातमोजे घातलेल्या दिसल्या. त्या दोनदा पंतप्रधान मोदींना भेटल्या आणि दोन्ही प्रसंगी त्यांनी हातमोजे घातलेले नव्हते. राणीच्या मृत्यूनंतर मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 2015 आणि 2018 मध्ये माझ्या यूकेच्या दौऱ्यांदरम्यान राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याशी संस्मरणीय भेटी ( memories with Queen Elizabeth II during UK tours) झाल्या. त्यांचा उत्साह आणि दयाळूपणा मी कधीही विसरणार नाही. एका भेटीत त्यांनी मला महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात भेट दिलेला रुमाल दाखवला. ते अविस्मरणीय क्षण मी नेहमी जपत राहीन. याउलट, त्या मनमोहन सिंग यांना दोनदा भेटल्या आणि दोन्ही प्रसंगी हातमोजे घातलेले होते. मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदा राणीची एप्रिल 2009 मध्ये आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये पुन्हा भेट घेतली.

यांच्याशी घेतली हातमोजेंशिवाय भेट :राणी एलिझाबेथची हातमोजे न घालण्याची पसंती केवळ भारतीय पंतप्रधानांना भेटतानाच नाही, तर अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटतानाही दिसून आली. 21 एप्रिल 1926 रोजी जन्मलेल्या त्या 6 फेब्रुवारी 1952 पासून युनायटेड किंगडम (UK) च्या राणी होत्या. राणी म्हणून 70 वर्षांहून अधिक काळ त्यांनी अमेरिकेच्या 14 राष्ट्राध्यक्षांना भेटले आहे. बिल क्लिंटनसोबत त्या हातमोजेशिवाय दिसल्या. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि सध्याचे जो बिडेन यांच्या बाबतीत, त्या हातात हातमोजे घालून दिसल्या.

व्हाईट हाऊस ब्रिटनच्या दुःखात सामिल :व्हाईट हाऊसने क्वीन एलिझाबेथच्या फोटोंसह ट्विट्सची मालिका पोस्ट केली कारण त्या 14 पैकी 13 अध्यक्षांना भेटल्या. त्यांच्या इतिहास घडविण्याच्या सात दशकांच्या काळात, राणी एलिझाबेथ II ने 14 यूएस राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, बिडेन हॅरिस प्रशासन आणि अमेरिकेतील लोकांचे विचार आणि प्रार्थना ब्रिटन आणि कॉमनवेल्थच्या लोकांसोबत दुःखात सामिल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details