इस्लामाबाद:पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पंजाब विधानसभेच्या उपसभापतींनी 10 मतांना रद्द करण्याचा निर्णय असंवैधानिक ठरवला. तसेच पीएमएल-क्यू नेते चौधरी परवेझ इलाही ( PML-Q leader Chaudhary Parvez Elahi ) यांना राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त ( Parvez Elahila Chief Minister of Punjab ) केले. या निर्णयामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना मोठा धक्का बसला आहे.
बहुमत मिळवूनही शुक्रवारची निवडणूक हरलेल्या परवेझ इलाही यांनी पंतप्रधान शरीफ यांचा मुलगा हमजा यांना विजयी घोषित करणाऱ्या उपसभापती दोस्त मजारी यांच्या निर्णयाला आव्हान ( Challenge to Deputy Speaker Dost Mazari decision ) दिले. सरन्यायाधीश उमर अता बंदियाल, न्यायमूर्ती इजाजुल अहसान आणि न्यायमूर्ती मुनीब अख्तर यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. त्यांनी परवेझ इलाही हे पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असल्याचा निर्णय दिला.