पोर्ट मोरेस्बी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा दिवसाच्या जी 7 शिखर परिषदेच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या दौऱ्यानंतर पापुआ न्यू गुनिया येथे भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल बॉब डेडे यांच्याशी सोमवारी पहिल्या भेटीवर आल्याच्या काही तासांनंतर चर्चा केली. भारत आणि 14 पॅसिफिक बेट देशांमधील द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
नरेंद्र मोदी आणि जेम्स मारापे यांच्यात चर्चा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एला बीच येथील APEC हाऊसला भेट दिली. त्यानंतर पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पंतप्रधान मोदी त्यांच्या पापुआ न्यू गिनी पंतप्रधानांशी हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्ट मोरेस्बी येथील एला बीचच्या काठावर असलेल्या आयकॉनिक APEC हाऊसमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान जेम्स मारापे यांनी त्यांचे मनापासून स्वागत केल्याची माहितीही या ट्विटमध्ये देण्यात आली आहे.
दोन्ही देशाच्या सहकार्याला चालना देण्यासाठी परिषद :पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी जपानहून पापुआ न्यू गुनी येथे आले आहेत. जापानला त्यांनी G7 प्रगत अर्थव्यवस्था शिखर परिषदेला हजेरी लावली आणि अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पापुआ न्यू गिनी येथे येऊन पंतप्रधान पंतप्रधान जेम्स मारापे यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यावेळी 'दोन्ही नेते प्रादेशिक सहकार्याला चालना देण्यासाठी FIPIC III शिखर परिषदेचे आयोजन करणार असल्याचे नमूद केले. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिजीच्या दौऱ्यादरम्यान FIPIC लाँच करण्यात आले होते. मात्र ही परिषद चीन या प्रदेशात आपले वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात असताना होत असल्याने चर्चेत आहे.