कैरो (इजिप्त) : इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी 25 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील सर्वोच्च सन्मान 'ऑर्डर ऑफ द नाईल' ने सन्मानित केले. 1915 पासून देण्यात येणार हा पुरस्कार इजिप्त किंवा मानवतेसाठी अमूल्य सेवा देणाऱ्या राष्ट्रप्रमुख, राजकुमार आणि उपराष्ट्रपतींना दिला जातो. विशेष म्हणजे, जगभरातील विविध देशांनी पंतप्रधान मोदींना प्रदान केलेला हा 13 वा सर्वोच्च राज्य सन्मान आहे.
'ऑर्डर ऑफ द नाईल' ची रचना : 'ऑर्डर ऑफ द नाईल' हा शुद्ध सोन्याचा कॉलर आहे, ज्यामध्ये तीन-चौरस सोन्याच्या युनिट्सचा समावेश आहे. यामध्ये फारोनिक चिन्हे आहेत. पहिले युनिट दुष्टांपासून राज्याचे संरक्षण करण्याला दर्शवते, दुसरे नाईल नदीने आणलेल्या समृद्धी आणि आनंदाला तर तिसरे संपत्ती आणि सहनशक्तीला दर्शवते. नीलमणी आणि माणिक यांनी सजवलेल्या गोलाकार सोन्याच्या फुलाने हे तीन युनिट एकमेकांना जोडलेले आहेत. कॉलरला लटकलेला एक षटकोनी लटकन आहे जो फारोनिक शैलीच्या फुलांनी व नीलमणी आणि माणिक रत्नांनी सजलेला आहे. पेंडेंटच्या मध्यभागी, नाईल नदीचे प्रतिनिधित्व करणारे प्रतीक आहे.
मोदी यांना आत्तापर्यंत प्रदान करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची यादी :
- कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू -पापुआ न्यू गिनीने पॅसिफिक देशांच्या एकतेसाठी आणि ग्लोबल साउथचे नेतृत्व केल्याबद्दल मोदींना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. - मे 2023
- कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी - पंतप्रधान मोदींच्या जागतिक नेतृत्वाच्या सन्मानार्थ फिजीचा सर्वोच्च सन्मान – मे 2023
- पलाऊ तर्फे इबाकल पुरस्कार -पापुआ न्यू गिनीच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींना पलाऊचे अध्यक्ष सुरंगेल एस. व्हिप्स, जूनियर यांनी इबाकल पुरस्काराने सन्मानित केले. - मे 2023
- ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो - भूतानने डिसेंबर 2021 मध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान, ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो देऊन सन्मानित केले.
- यू.एस. सरकारद्वारे लीजन ऑफ मेरिट -युनायटेड स्टेट्स सशस्त्र दलाचा पुरस्कार - 2020
- किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स - हा आखाती देशाचा सर्वोच्च सन्मान आहे – 2019
- ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इज्जुद्दीन -विदेशी मान्यवरांना देण्यात येणारा मालदीवचा सर्वोच्च सन्मान -2019
- ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्कार -रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान – 2019
- ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार -संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च नागरी सन्मान - 2019
- ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन अवॉर्ड -परदेशी मान्यवरांना देण्यात येणारा पॅलेस्टाईनचा सर्वोच्च सन्मान - 2018
- स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान -अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान - 2016
- ऑर्डर ऑफ अब्दुलअजीझ अल सौद -गैर-मुस्लिम मान्यवरांना सौदी अरेबियाचा सर्वोच्च सन्मान - 2016
हेही वाचा :
- Biden Gift To Modi : 'AI भविष्य आहे', बायडन यांनी मोदींना भेट दिलेल्या टी-शर्टवर काय लिहिले आहे?, जाणून घ्या